तवय परमेश्वर मोशेले बोलना; चाल, खाल उतर, कारन ज्या तुना माणसे तु मिसर देशमाईन आणेल शे त्या बिघडी जायेल शेतस; ज्या मार्गतीन त्या जावाले पाहिजे व्हतात मनीसनं मी त्यासले आज्ञा देयेल व्हती तो मार्ग सोडीसनं त्या बहकी जायेल शेतस; त्यासनी ओतीव वासरु बनाडीसनं त्यानी पुजा आरचा करी अनी त्याले बली अर्पन करं अनी हे, इस्त्राएला, ज्यानी तुले मिसर देशामाईन सोडायेल शे त्याच हया तुना देव आशे त्या बोलाले लागना शेतस.