YouVersion Logo
Search Icon

लुका 6:27-49

लुका 6:27-49 VAHNT

“पण मी तुमाले आयकणाऱ्यायले म्हणतो कि आपल्या वैऱ्यावर पण प्रेम करा, जो तुमचा द्वेष करतीन, त्यायचं चांगलं करा. जो तुमाले शाप देईन, त्याले आशीर्वाद द्या; जो तुमचा अपमान करीन, त्याच्यासाठी प्रार्थना करा. जो तुमच्या एका गालावर थापड मारीन, त्याच्या पुढे दुसरा पण गाल दे. अन् जो तुह्या मनिला हिसकावीन, त्याले तुह्या सदरा पण घ्याले म्हणा करू नको. अन् जो कोणी तुले मांगत अशीन त्याले द्या, अन् जो कोणी तुह्यावाली वस्तु हिसकन त्याले वापस मांगू नको.” अन् जसं तुमाले वाटते कि लोकायन तुमच्या संग केलं पायजे, तुमी पण त्यायच्या सोबत तसाच व्यवहार करत जा. “जर तुमी आपल्या प्रेम करणाऱ्या संगच प्रेम करान, तवा तुमी कोणत मोठं काम केलं? कावून कि पापी लोकं पण आपल्या प्रेम करणाऱ्यावर प्रेम करते. अन् जर तुमी आपल्या चांगलं करणाऱ्यावाल्या संगच चांगलं करान, तर तुमी कोणत मोठं काम केलं? कावून कि पापी लोकं पण असचं करतात. कावून कि जर तुमी त्याले उधार देसान तर त्याच्या कडून वापस भेटीन म्हणून आशा ठेवता, तर तुमी कोणत मोठं काम केलं? इथपरेंत कि पापी लोकं पापी लोकायले उधार देत असते, कावून कि त्यायले वापस भेटन. पण आपल्या शत्रूवर प्रेम करा, अन् त्यायचं चांगलं करा, अन् मंग वापस भेटलं नाई पायजे म्हणून उधार द्या; तवा तुमच्यासाठी मोठं प्रतिफळ अशीन; अन् तुमी परमप्रधान देवाचे लेकरं होसान, कावून तो त्यायच्यावर जो धन्यवाद नाई करत, अन् बेकार लोकायवर पण कृपा करते. जसा तुमचा देवबाप दयाळू हाय, तसेच तुमी पण दयाळू बना.” “दोष नका लावू, म्हणजे तुमच्यावर पण दोष लावला जाणार नाई: कोणाले पण दोषी नका ठरवा, तवा तुमी पण दोषी ठरवल्या जाणार नाई, तुमी दुसऱ्यायले क्षमा करा तर तुमाले पण क्षमा केल्या जाईन. देत जासाल तर तुमाले पण देल्या जाईन: लोकं पूर्ण माप दाबून-दाबून अन् हालवून-हालवून अन् शिग भरून तुमच्या पदरात टाकतीन, कावून कि ज्या मापान तुमी मापसान त्याचं मापान तुमच्यासाठी मापल्या जाईन.” मंग येशूनं त्यायले एक कथा सांगतली कि “एक फुटका दुसऱ्या फुटक्याले रस्ता दाखऊ शकत नाई, असं झालं तर ते दोघही गड्यात पडतीन. शिष्य आपल्या गुरु पेक्षा मोठा नाई, पण जो परिपूर्ण अशीन तो जवा आपलं प्रशिक्षण पूर्ण करणार तवा तो गुरु सारखा होईन. तू कावून आपल्या भावाच्या लहान-लहान चुका पायतो, आपल्या सोताच्या मोठ्या-मोठ्या चुका तुले दिसत नाई काय? जवा तुह्याल्या जीवनात एवढ्या मोठ्या चुका हाय, तवा तू आपल्या भावाले कसा म्हणू शकतो, हे भावा, थांब मी तुह्याले दोष दूर करून तुह्यावाली मदत करतो. हे कपटी पयले आपल्या जीवनातले दोष दूर कर, तवा तू आपल्या भावाच्या जीवनातले दोष मोठ्या हक्कान दूर करू शकशीन.” “कोणत्याही चांगल्या झाडाले, बेकार फळ येणार नाई, अन् बेकार झाडाले, चांगलं फळ येणार नाई. हरएक झाड आपल्या फळापासून ओयखल्या जाते; कावून कि लोकं झुडपासून अंगुर या काटेरी झाडापासून अंजीर तोडत नाई. एक चांगला माणूस आपल्या चांगल्या मनाच्या खज्याण्यातून चांगल्या गोष्टी काढतो, अन् बेकार माणूस आपल्या बेकार मनाच्या खज्याण्यातून बेकार गोष्टी काढते; कावून कि जे मनात भरून हाय तेच तोंडावर येते.” “जवा तुमी माह्यी गोष्ट नाई आयकतं, तर मले हे प्रभू हे प्रभू कायले म्हणता? जो कोणी माह्यापासी येते, अन् माह्याली गोष्ट आयकून त्याले मानते, मी तुमाले सांगतो, कि तो कोण्या सारखे हाय? तो त्या माणसा सारखा हाय, ज्यानं घर बांध्याच्या वाक्ती जमीन खोल खोदुन गोट्यावर पाया टाकला, अन् मंग जवा पूर आला, तवा पाण्याची धार त्या घराले लागली पण त्या घराले हालवू शकली नाई; कावून कि ते गोट्यावर बांधलं होतं. पण जो कोणी माह्याली गोष्ट आयकून नाई मानत तो त्या माणसा सारखा हाय, ज्यानं जमिनीवर पाया न टाकता घर बांधला अन् मंग जवा त्याच्यावर पाण्याची धार लागली तवा तो लवकरच पडून गेला, अन् पडून पूर्ण सत्यानाश झाला.”