YouVersion Logo
Search Icon

ख्रिस्ताचे अनुसरण करणेSample

ख्रिस्ताचे अनुसरण करणे

DAY 12 OF 12

ख्रिस्ताचे अनुसरण करण्याचा परिणाम

जे येशूचे अनुसरण करीत होते त्यांनी त्याने केलेल्या सर्व गोष्टी अगदी जवळून पाहता आल्या. त्यांनी चमत्कार पाहिले,त्यांनी पुनर्स्थापन पाहिले,त्यांनी मृतांना जिवंत झालेले पाहिले,त्यांनी बहिष्कृत आणि नाकारलेल्यांची बिनशर्त स्वीकृती पाहिली. त्यांनी बहुगुणित भाकरी पोटभर खाल्ली,वादळ समुद्राच्या शांततेचा त्यांनी आनंद लुटला आणि ज्यांच्यासोबत ते कधीच मेजावर बसले नसतील त्यांची त्यांनी भेट घेतली!

जेव्हा तुम्ही आणि मी खरोखर येशूचे अनुसरण करतो,तेव्हा आम्हाला हे अनुभव येऊ लागतात. येशूने स्वतः सांगितले की त्याच्यावर विश्वास करणारे आपण त्याच्यापेक्षा मोठमोठी कामे करू.

हे आश्चर्यकारक नाही का?

प्रश्न असा आहे की आपण येशूचे इतक्या जवळून अनुसरण करणे निवडणार का?

मी माझा वधस्तंभ उचलण्यास,दररोज स्वतःचा नाकार करण्यास आणि माझ्या संपूर्ण अंतःकरणाने,आत्म्याने,मनाने आणि शक्तीने त्याचे अनुसरण करण्यास तयार आहे का?

तुम्ही हलक्याने घ्यावा असा हा प्रश्न नाही. तुम्ही जी किंमत चुकविणार आहात त्यावर विचार करावयास हवा,परंतु ते असंख्य पुरस्कार देखील लक्षात घ्यावे जे अशा समर्पित जीवनाच्या प्रतीक्षेत आहेत. जेव्हा तुम्ही येशूच्या इतक्या निकट सानिध्यात चालण्याची निवड कराल तेव्हा तुम्ही त्या गोष्टींचा अनुभव कराल ज्यांचा अनुभव शिष्यांनी तेव्हा अनुभव केला जेव्हा ते पृथ्वीवर येशूचे अनुसरण करीत होते. इतकेच नाही,कारण तुम्ही त्याला न पाहता विश्वास ठेवता,म्हणून तुमचे प्रतिफळ मोठे आहे. यात भर म्हणजे पवित्र आत्म्याचे अविश्वसनीय कृपादान जो आम्हाला अंतर्ज्ञान आणि सामर्थ्यासह जगण्यात मदत करतो यासाठी की आम्ही केवळ बदलून जात नाही तर आम्ही आपल्या सभोवतालच्या जगात बदल घडवून आणतो.

येशूच्या सहअनुयायांनो,तुम्ही एका रोमांचक प्रवासासाठी तयार आहात का?

घोषणा: माझ्याठायी ख्रिस्तामुळे येथे पृथ्वीवर मी देवाचे राज्य पाहणार आहे.

Scripture

About this Plan

ख्रिस्ताचे अनुसरण करणे

जर तुम्ही हा विचार करीत असाल की खरोखर दररोज येशूचे अनुसरण कसे करावे तर ही बायबल योजना परिपूर्ण आहे. येशूला होय म्हणणे अर्थातच पहिले पाऊल आहे. पण जे होते, ते म्हणजे वारंवार हो म्हणण्याचा आणि त्याच्याबरोबर पाऊल टाकण्याचा आयुष्यभराचा प्रवास आहे.

More