देवाचे चिलखत - प्रेषितांची कृत्येSample

आत्म्याची तलवार
पवित्र शास्त्रातील गोष्ट – पेत्र लोकसमुदायाशी बोलतो"प्रेषित 2:12-17, 22-30, 34-41"
आत्म्याची तलवार ही शस्त्रसामग्रीतील पहिली वस्तू आहे जी बचावाच्या ऐवजी शस्त्र आहे. ह्याचा अर्थ हा आहे कि आपण त्याच्यासह शत्रूवर हल्ला करू शकतो. ‘‘वचनाची तलवार’’ पवित्र शास्त्र, किंवा देवाचे वचन आहे. लढाईत तलवारीचा उपयोग करण्यासाठी तुम्हाला वचन माहित असायला हवे. ह्याचा अर्थ हा कि तुम्ही पुन्हा पुन्हा तुमचे संपूर्ण शास्त्र वाचत राहावे आणि पवित्र शास्त्रातील वचनं पाठ सुध्दा करावी. आजच्या प्रेषितांचे कृत्ये ह्या पुस्तकातील सत्य घटनेत पेत्र लोकसमुदायाला संदेश देत असतांना वचनांचा उपयोग करतो. असे लोक होते जे देवावर विश्वास ठेवत नव्हते आणि त्याची थट्टा उडवू लागले. जे थट्टा करत होते त्यांच्याशी बोलण्यासाठी पेत्र उभा राहिला आणि त्याने केवळ त्यांना संदेश दिला नाही तर लढाई लढण्यासाठी त्याने वचनांचा उपयोग केला.जेव्हा आपल्याला वचनं पाठ असतात, तेव्हा आपण जेव्हा गरज आहे तेव्हा त्याचा उपयोग करू शकतो. त्या दिवशी पेत्राच्या संदेशा मूळे तीन हजार लोकांचे तारण झाले आणि त्यांनी मंडळीत प्रवेश केला. किती मोठा आर्शिवाद! पेत्राने त्याच्या तलवारीचा उपयोग कौशल्याने केला कारण त्याच्या विशिष्ट प्रसंगासाठी त्याने परिपूर्ण वचन पाठ केलेले होते. त्याने कौशल्याने शत्रू बरोबर लढाई केली आणि प्रभूसाठी 3000 लोकांना जिंकले!
जितके ज्यास्त वचनं तुम्हाला माहित असले तितके ज्यास्त तुम्ही तलवार चालवाल. जेव्हा आपण वचन वाचले आणि ते पाठ केलेले असेल, तेव्हा आपल्याला पाहिजे तेव्हा देव ते आपल्या मनात आणू शकतो. तुम्ही तलावरीच्या बाबतीत कसे आहात?
‘‘मी देवाचे वचन पाठ करणे व त्याचा माझ्या दैनंदिन जीवनात उपयोग करण्याचा निर्णय घेतो.’’
प्रश्न:
1.तुम्ही शत्रूच्या विरुद्ध हल्लात्मक केव्हा असू शकता?
2.ख-या जीवनात तलवारीने वार करणे ह्याचे उदाहरण कोणते आहे?
3.आत्म्याच्या तलवारीचा दुरउपयोग कसा केला जातो?
4.पेत्र यरूशलेम मध्ये पन्नासाव्या दिवशी जे बोलला त्यामूळे किती लोक ख्रिस्ती झाले?
5.नविन ख्रिस्ती लोक ख्रिस्ताचे अनुसरण करणार आहेत हे दाखविण्यासाठी त्यांनी काय केले?
Scripture
About this Plan

देवाची शस्त्रसामग्री धारण करणे हे रोज सकाळी केल्या जाणारी एक प्रार्थना विधी नव्हे परंतु तो जीवन जगण्याचा एक असा मार्ग आहे ज्याची सुरुवात आपण तरुण असतानाच करू शकतो. क्रिस्टी क्रॉसने लिहिलेली ही वाचन योजना प्रेषितांचे कृत्ये या पुस्तकातील वीरांकडे लक्ष देते.
More
Related Plans

Transformational Days of Courage for Women

Unshakable Love: 5 Days to Feeling Known, Carried & Cherished by God

The 3 Types of Jealousy (And Why 2 Aren't Sinful)

God Is With Us

Connecting With the Heart of Your Child

The Lord's Prayer

Don't Take the Bait

Gems of Motherhood~ Letters to a Mama: 20ish Things I Wish I Knew Before Becoming a Mom

The Unique Ministry of Motherhood
