YouVersion Logo
Search Icon

देवाचे चिलखत - प्रेषितांची कृत्येSample

देवाचे चिलखत - प्रेषितांची कृत्ये

DAY 8 OF 10

तारणाचे शिरस्त्राण

पवित्र शास्त्रातील गोष्ट – शौलाचे परिवर्तन"प्रेषित 9:1-19"

आपण तारणाचे शिस्त्राण घालावे हे महत्वाचे आहे कारण जर आपल्या डोक्यावर वार झाला तर ते जीवघेणे होवू शकते.आपले शिरस्त्राण डोक्यावर आहे हे कसे निश्चित करावे? पवित्र शास्त्र स्पष्ट करते कि ख्रिस्ताने वधस्तंभावर पूर्ण केलेल्या कार्यावर आपले तारण आधारित आहे. जेव्हा तो आपल्या पापासाठी मरण पावला तेव्हा, त्याने खंडणी भरली आणि आपले तारण विकत घेतले! आपण चांगले कार्य करून स्वर्गात जाण्याचा मार्ग कमावू शकत नाही, तर केवळ येशू ख्रिस्तावर भरवसा करून आपण तारले जातो. दररोज आपल्या तारणाचे शिरस्त्राण घालण्यासाठी आपल्याला प्रार्थना समारंभ करण्याची गरज नाही. जर आपण आपल्या तारणासाठी प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवला आहे तर, आपण आपले शिरस्त्राण घातले आहे!

प्रेषितांची कृत्ये मधील पवित्र शास्त्रातील गोष्टीमध्ये शौलाला देव चमत्कारिक रित्या दिसला, शौल जो ख्रिस्ती लोकांवर हसत असे व त्यांचा छळ करत असे तो नंतर पौल बनला. एक दिवस दिमिष्काच्या रस्त्यावर येशू अचानक शौलाला स्वर्गातील तेजस्वी प्रकाशासह दिसला आणि शौल अंधळा होऊन जमीनीवर पडला. तीन दिवसानंतर, देवाने एका ख्रिस्ती व्यक्तिला त्याला बरे करून ख्रिस्ताकडे आणण्यासाठी पाठविले. त्या आठवडी शौलाने येशूवर विश्वास ठेवला आणि त्याचे तारण झाले!

जर तुम्ही प्रार्थना कराल आणि तुमच्या तारणासाठी प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवाल तर, जसे पौलाने घातले तसे, तुम्ही आज तुमचे तारणाचे शिरस्त्राण घालू शकता.माझ्याबरोबर प्रार्थना करा,‘‘प्रिय येशू, आज मी मान्य करतो कि मी पापी आहे आणि मी चूक केली आहे. मी विश्वास ठेवतो कि तू माझ्यापापासाठी वधस्तंभावर मरण पावला आणि तू खरा आहेस. मी तुला प्रभू व तारणारा म्हणून माझ्या ह्रदयामध्ये स्वीकारतो. मला स्वीकारल्या बद्दल,माझ्यावर प्रिती केल्याबद्दल आणि तुझया बरोबर मला स्वर्गात सार्वकालिक जीवन दिल्या बद्दल मी तुझे आभार मानतो.’’

‘‘मी माझ्या तारणासाठी प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवण्याची निवड करतो.’’

प्रश्न:

1.तुम्ही तुमच्या तारणा संबंधी शाश्वत असू शकता काय?

2.तुम्ही तारण गमावू शकता असे तुम्हाला वाटते काय?

3.शौल त्याच्या घोडयावर बसून दिमिष्काच्या रस्त्यावर जात असतांना काय झाले?

4.देवाने दिमिष्काच्या हनन्याला काय सांगितले?

5.हनन्याने देवाला काय सांगितल? जर आपण देवाकडे तक्रार करतो तर काय होते?

About this Plan

देवाचे चिलखत - प्रेषितांची कृत्ये

देवाची शस्त्रसामग्री धारण करणे हे रोज सकाळी केल्या जाणारी एक प्रार्थना विधी नव्हे परंतु तो जीवन जगण्याचा एक असा मार्ग आहे ज्याची सुरुवात आपण तरुण असतानाच करू शकतो. क्रिस्टी क्रॉसने लिहिलेली ही वाचन योजना प्रेषितांचे कृत्ये या पुस्तकातील वीरांकडे लक्ष देते.

More