YouVersion Logo
Search Icon

छळात भितीचा सामना करणेSample

छळात भितीचा सामना करणे

DAY 1 OF 7

भीतीच्या वेळेस पळून जाणे

येशूचे शिष्य त्याचे अनुसरण करण्याचा निर्णय घेतला त्या दिवसापासून तर त्याला वधस्तंभावर खिळले गेले त्या दिवसापर्यंत त्याच्या जवळ राहिले. परंतू छळाच्या पहिल्या चिन्हापासून त्यांनी त्याचे अनुसरण केले नाही तर ते पळून गेले! जेव्हा धोका असतो तेव्हा भिती ही साधारण मानवी भावना आहे. जर या शिष्यांना भिती वाटली नसती तर ते मानव नसते! भिती आपल्याला लढण्यासाठी किंवा पळण्यासाठी तयार करते. जेव्हा येशूला पकडण्यात आले व वधस्तंभावर खिळले गेले तेव्हा ते त्यांचा छळ व मृत्यू याच्या भितीवर विजय मिळवू शकले नाही. जरी आपण पेत्रासारखे कबूल करतो की,आपण कधीच ख्रिस्ताचा नकार करणार नाही,तरी जर आपण पवित्र आत्म्यावर अवलंबून राहणार नाही तर आपण त्याचा नकार करण्याची शक्यता आहे.

वचनात उल्लेख केलेला तरूण देखील त्याची नग्नता झाकणारे वस्त्र सोडून त्याचा जीव वाचविण्यासाठी पळाला. परंतू शेवटी त्यांच्या सर्व गोष्टी हे दाखवितात की त्यांनी त्यांच्या प्रभूला कधी सोडले नाही! ब-याच विद्वानांच्या मते हा तरूण मार्क,शुभवर्तमानाचा लेखक होता. किती मोठा बदल! त्याने त्याच्या मंडळीच्या बांधणी साठी त्यांना छळाच्या दरीतून वर आणले! भितीमूळे छळापासून पळून गेलेल्यांपैकी तुम्ही एक असू शकता,परंतू तुम्ही परत येऊन मंडळीची पुर्नबांधणी करण्याची संधी तुम्हाला आहे.

वचनबध्द व्हा आणि प्रार्थना करा.

छळाच्या भितीने तुम्ही पुष्कळ वेळा जवाबदारीपासून पळ काढला नाही काय?

प्रार्थना करूकी आपण जरी छळाच्या भितीमूळे पळालो तरी पुन्हा उद्देशाकडे व मंडळी बांधणी कडे परत येऊ.

About this Plan

छळात भितीचा सामना करणे

जेव्हा कोणाचा छळ होतो तेव्हा भिती ही सर्वात शक्तिशाली भावना असते. हल्ले, तुरूंगवास, मंडळ्या बंद करणे आणि प्रिय व्यक्तिंचे व सह विश्वासणा-यांचे विश्वासामूळे मरण होणे या सर्व गोष्टी आपल्याला आपल्या ख्रिस्ती विश्वासाच्या प्रवासात पुढे जाण्यासाठी भितीदायक वाटण्यास व असहाय वाटण्यास कारण ठरू शकतात. जर तुम्हाला आता त्याची भिती वाटत असेल तर ही वाचन योजना जेव्हा तुम्ही छळाचा सामना कराल त्यासाठी तयारी करण्यासाठी एक उत्तम मार्ग आहे.

More