पाचारण झालेले आणि निवडलेले -कॉल केलेले आणि निवडले - ख्रिस्तामध्ये तुमचे DNA समजून घेणेSample

आता जरआपण पूर्णपणे हे जाणतो की आपला देव सर्वोत्तम देव आहे आणि वधस्तंभावरील पूर्ण झालेल्या कार्यामुळे, देवाच्या सामर्थ्यातआपण अशक्य गोष्टीही साध्य करू शकतो तर आपण विश्वासाची मोठी झेप घेऊनपरमेश्वर देवाची पूर्ण अंतःकरणाने, विश्वासाने आणि परिश्रमपूर्वक सेवा करू शकतो आणि ती ही त्याचे मुलेम्हणून, पोरके-अनाथ किंवा दास म्हणून नव्हे!
पोरके-अनाथ हृदय
अनाथ किंवा दाससर्वांच्या नंतर येतात आणि प्रथम बाहेर पडतात. कारण त्यांना त्यांच्या पित्याच्या कार्याची पर्वा नसते, तेफक्त स्वतःचाविचार करतात. अनाथ हृदय बाहेर टाकले जात नाही. नूतनीकरण झालेल्या मनाने त्याचे परिवर्तन केले जाते.
जेव्हा तुम्हाला देवाच्या घरातील पुत्र किंवा कन्या म्हणून तुमचे स्थान आणि तुमची ही खरी ओळख समजते, तेव्हा तुम्ही सुध्दाप्रभु येशूप्रमाणेच आनंदाने जबाबदाऱ्या स्वीकारता. त्याने समोर दिसणाऱ्या सार्वकालिक आनंदाकरिता, आपल्या मित्रांसाठी तुम्हां-आम्हांसाठी आपला प्राण अर्पिला.
आपल्याठायी ‘पुत्र’ आहेआणि त्याद्वारे कृपा आणि अनुकूलता आहे जेणेकरून आपण इतरांना सक्षम करू शकतो आणि इतरांना त्यांच्या जीवनातील दैवी योजनापूर्ण करण्यास देवाकडे बोलावू शकतो. आपण जगाचा प्रकाश बनतो.आपल्याला ख्रिस्तामध्ये अमर्यादित संसाधने उपलब्ध झाली आहेत, परंतु आपण कधीकधी दरिद्री मानसिकतेत जगतो.
देवाने त्याचा पवित्र आत्मा आम्हांमध्ये ओतून त्याने आपल्याला निवडले आणि नेमले यामहत्त्वाच्या जाणीवेसह जेव्हा आपण जगू लागतो, तेव्हा आमची विचारसरणी व वर्तणूक निराळी होते.
जे जीवन आधी तुम्ही स्वतःला संतुष्ट करण्यासाठी जगत होता ते जीवन आतासेवामय, इतरांची सेवा करणारे असे जीवन होईल. स्वर्गीय पित्याने सर्व काही आपल्याअधिपत्याखाली ठेवले आहे हे जाणूनही राजा येशूने ज्या नम्रतेने रुमाल व पाण्याचे गंगाळ घेऊन आपल्या शिष्यांचे पाय धुतले अगदी त्याचप्रमाणे.
माझ्यामते आपण खरेच कोण आहोत आणि कोणतेगौरवशाली वैभव आपली वाट पाहात आहे हे पाहण्यासाठीआपल्याला आपली नजर बदलणे गरजेचे आहे.या नश्वर जगात, विजेत्याहून अधिक असे आणि ‘जगाचे मीठ व प्रकाश’ होऊन जगताना आपल्याला या जगाला त्याविषयी सांगण्याची ही आवश्यकता आहे. .
तुमची पार्श्वभूमी काय आहे, तुमचा पृथ्वीवरील पिता तुम्हांला ठाऊक आहे की नाही,तुम्ही थाटामाटात जन्मला की नाहीहे महत्त्वाचे नाही.वधस्तंभावर सर्वकाही रद्द होऊन तुमच्या जीवनाचे एक नवीन पुस्तक उघडले गेले आहे आणि तुम्हाला एक नवीन डी.एन.ए.लाभला आहे. हे जतन करा कारण ख्रिस्ताने आधीच तुम्हांला त्याच्या उराशीधरून ठेवले आहे.
या महान सत्यामध्ये आनंद करा आणि या आनंदात जगा की परमेश्वर देवाने मोठया आनंदानेतुम्हांला पाचारण करीत निवडले आणि नेमले आहे.
माझी प्रार्थना आहे की तुम्हांस तुमची खरी ओळख पटून विपुल जीवनाचा आनंद मिळावा आणि परमेश्वरासहतुम्ही तुमचे ध्येय गाठावे.
मननासाठी बिंदू:
- तुम्ही स्वतःला देवाची मुले म्हणून पाहता की एखाद्या पोरक्या-अनाथ किंवा दासाप्रमाणे वागत आहात?
- तुम्हांस हे ठाऊक आहे का की तुम्ही कोण आहात आणि तुम्हांला देवाने पाचारण करून निवडले व नेमले आहे? तुम्ही तुमच्या‘नवीन डी.एन.ए.’ मध्ये जगत आहात का?
Scripture
About this Plan

पाचारण झालेले आणि निवडलेले... ‘ख्रिस्तामध्ये आशीर्वादित आणि ख्रिस्ताठायी निवडून घेतलेले’ (6 दिवसांचा मनन-पाठ) तुम्ही देवाची हस्तकृति आहात आणि सर्व स्वर्गीय वैभवांनी आशीर्वादित करण्यासाठी देवाने तुमची निवड केली आहे हे सत्य तुम्ही जाणता का? राजेशाही थाटात जगणे किंवा हलाखीच्या परिस्थितीत खितपत पडून राहणे हे सर्वस्वी तुमच्या हातात आहे. तुमच्या जीवनासंबंधी देवाची अदभूतरम्य अशी योजना व संकल्प आहेत. इफिस.१:३-५ या शास्त्रभागावर आधारित हा सहा दिवसांचा मनन-पाठ (भक्तिसामग्री) वर्ड ऑफ ग्रेसच्या नवाझ डिक्रुझ (Navaz DCruz) यांनी लिहिली असून विक्रम अरविंद जाधव यांनी अनुवादित केली आहे.
More
Related Plans

Messengers of the Gospel

Peter, James, and John – 3-Day Devotional

A Mother's Heart

Built for Impact

Live the Word: 3 Days With Scripture

Connecting With the Heart of Your Child

Multivitamins - Fuel Your Faith in 5-Minutes (Pt. 3)

Moses: A Journey of Faith and Freedom

40 Rockets Tips - Workplace Evangelism (31-37)
