पाचारण झालेले आणि निवडलेले -कॉल केलेले आणि निवडले - ख्रिस्तामध्ये तुमचे DNA समजून घेणेSample

शास्त्रपाठ : इफिस.१:३-५
३आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचा देव व पिता धन्यवादित असो. त्याने स्वर्गातील सर्व आध्यात्मिक आशीर्वाद देऊन आपल्याला ख्रिस्तामध्ये आशीर्वादित केले आहे;
४त्याचप्रमाणे आपण त्याच्या समक्षतेत पवित्र व निर्दोष असावे, म्हणून त्याने जगाच्या स्थापनेपूर्वी आपल्याला ख्रिस्ताच्या ठायी निवडून घेतले.
५त्याने आपल्या मनाच्या सत्संकल्पाप्रमाणे आपल्याला येशू ख्रिस्ताच्या द्वारे स्वतःचे दत्तक होण्याकरता प्रेमाने पूर्वीच नेमले होते.
तुम्ही कधी असा सांघिक खेळ खेळला आहे का जिथे संघात सामील करण्यासाठी कर्णधार स्वतः खेळाडूंनानिवडतात? आपल्या सर्वांना या प्रथम निवडलेल्यां खेळाडूंपैकी एक व्हायला आवडते, नाही का?
इफिकरांस लिहिलेल्यापत्रात आपण वाचतो की देवाने आपल्याला जगाच्या स्थापनेपूर्वीच कसे निवडून घेतले आहे. किंबहुना, “प्रकाश होवो” असे देवाने बोलण्यापूर्वीच त्याने तुम्हांला निवडण्याचा विचार केला होता.
हे विशेष पाचारण आपल्याला कसे आणि का करण्यात आले आहे आणि ख्रिस्तामध्ये आपल्या नवीन डीएनएचा, आपण कसे जगतो यावर काय परिणाम होतो हे आपण पाहणार आहोत.
व.३आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचा देव व पिता धन्यवादित असो.
धन्यवादासह केलेली सुरुवात नेहमीच उत्तम असते.
प्रेषित पौल कशासाठी देवाचे आभार मानत आहे? आपल्या आश्चर्यकारक आणि अदभूत तारणासाठी तो देवाचे आभार मानत आहे. आपणही आपल्या तारणासाठी दररोज देवाचे आभार मानण्याची सवय करून घेऊया.
हा देव कोण आहे आणि त्यास‘देव आणि पिता’ असे का म्हटले आहे?
तो फक्त परमेश्वर देव म्हणू शकला असता आणि तेवढे पुरेसे झाले असते. देव हा संपूर्ण विश्वाचा देव आहे. तथापि, देव विश्वाचा देव असल्यामुळे आपला पण देवआहे.
परमेश्वर देव आपला पिता कधी झाला?
ज्या वेळी आपण ख्रिस्ताचा स्वीकार केलात्या क्षणापासून देव आपला पिता झाला. त्यापूर्वी परमेश्वर देव आमचा पिता नव्हता. परमेश्वर देव हा सर्वसाधारण असा पिता नाही. तो एक चांगला, उत्तम असा पिता आहे ज्याने आपल्याला स्वर्गातील सर्व आध्यात्मिक आशीर्वादांनीआपल्या कल्पनेपेक्षा अधिकप्रमाणात आशीर्वादितकेले आहे.
ख्रिस्त-अनुयायी या नात्यानेदेवाला केंद्रस्थानी ठेऊनचआपल्या जीवनाचा आरंभ आणि अंत होतो. आपण “ख्रिस्ताच्या ठायी” आहोत. प्रभु येशू ख्रिस्त सध्या कुठे आहे? परमेश्वर देवपित्याच्या उजव्या हाताला. म्हणून, जर आपण ख्रिस्तामध्ये आहोत, तर आपण देखील ख्रिस्तासह स्वर्गीय स्थानी आहोत.
आपण आशीर्वादित आहोत आणि आपण परमेश्वर व ख्रिस्ताचे असल्यामुळेच देवाच्या अमर्याद कृपेस पात्र होतो.
शुभवर्तमान
आम्हांला ख्रिस्ताच्या रक्ताच्या द्वारे खंडणी भरून मिळवलेली मुक्ति म्हणजे आपल्या अपराधांची क्षमा आपल्याला मिळाली आहे. एकेकाळी आपण ह्या जगाच्या रहाटीप्रमाणे देवाच्या आज्ञा मोडत त्याच्या क्रोधास आणि अनंतकाळच्या नरकास पात्र असे होतो आणि देवाच्या उपस्थितीपासून पूर्णतः वंचित असे होतो.
एदेन बागेतील पापामुळेसमस्त मानवजातीवर अनंतकाळाचे अनिष्ट परिणाम झाले होते– जे प्रभु येशूच्या आगमनाने दूर झाले. येशू जो देव होता, तो मानव देही जन्मला आणि पापरहित जीवन जगला. त्याने आमच्या मुक्तीसाठी वधस्तंभावर एक भयानक आणि यातनामय मृत्यू स्वीकारला, खरेतर आपण या दंडास पात्र होतो. पण आमच्या प्रत्येकाच्या डोक्यावर टांगलेल्या या शापित शिक्षेस त्याने आमची जागा घेत ती शिक्षा स्वतः भोगली. आपल्या सर्वांसाठी एकदाचेच केलेलेते एकमेव परिपूर्ण त्यागाचे बलिदान ख्रिस्ताने केले आहे.
प्रभु येशूच्या या महान अर्पणामुळेच आपण परमेश्वर देवाला पिता म्हणू शकतो जसे प्रभु येशू त्याला पिता म्हणतो.
मननासाठी बिंदू:
- देवाला धन्यवाद द्या की तुम्ही त्यास पिता म्हणू शकता.
- तुम्ही ख्रिस्तामध्ये असल्यामुळे,तुम्हांस आशीर्वादाच्या स्वरुपात लाभलेल्या पाच गोष्टीं सांगू शकता का?
- तुमच्या प्रत्येक दिवसाची सुरुवात तुम्ही देवाला निदान पाच गोष्टींसाठी धन्यवाद देत, देवाचे आभार मानण्याची स्वतःला सवय लावा.
Scripture
About this Plan

पाचारण झालेले आणि निवडलेले... ‘ख्रिस्तामध्ये आशीर्वादित आणि ख्रिस्ताठायी निवडून घेतलेले’ (6 दिवसांचा मनन-पाठ) तुम्ही देवाची हस्तकृति आहात आणि सर्व स्वर्गीय वैभवांनी आशीर्वादित करण्यासाठी देवाने तुमची निवड केली आहे हे सत्य तुम्ही जाणता का? राजेशाही थाटात जगणे किंवा हलाखीच्या परिस्थितीत खितपत पडून राहणे हे सर्वस्वी तुमच्या हातात आहे. तुमच्या जीवनासंबंधी देवाची अदभूतरम्य अशी योजना व संकल्प आहेत. इफिस.१:३-५ या शास्त्रभागावर आधारित हा सहा दिवसांचा मनन-पाठ (भक्तिसामग्री) वर्ड ऑफ ग्रेसच्या नवाझ डिक्रुझ (Navaz DCruz) यांनी लिहिली असून विक्रम अरविंद जाधव यांनी अनुवादित केली आहे.
More
Related Plans

Messengers of the Gospel

Peter, James, and John – 3-Day Devotional

A Mother's Heart

Built for Impact

Live the Word: 3 Days With Scripture

Connecting With the Heart of Your Child

Multivitamins - Fuel Your Faith in 5-Minutes (Pt. 3)

Moses: A Journey of Faith and Freedom

40 Rockets Tips - Workplace Evangelism (31-37)
