दुःख कसे हाताळावे?Sample

देव अजूनही सिंहासनावर आहे.
जेव्हा मृत्यू अनपेक्षित मार्गाने येतो,उदाहरणार्थ अचानक झालेल्या अपघातामुळे,किंवा लहान मुलाचा अचानक मृत्यू होतो,तेव्हा नेहमीच असे वाटते की हे व्हायला नको होते. आपण नशिबाच्या घातपाती चक्रात अडकून पडलो आहोत. अचानक उद्भवलेल्या या संग्रामामुळे कधीकधी आपल्याला असे वाटू शकते की जणू देव देखील आश्चर्यचकित झाला आहे,कारण त्याने आपल्याला पुरेसा इशारा किंवा तयारीला वेळ दिला नाही,जसे की आपल्याला एखाद्या गंभीर आजाराचे निदान होते आणि अंदाजे किती आयुष्य असेल ही वेळ दिली जाते. .
पण बायबल आपल्याला आश्वासन देते की देव जीवन आणि मृत्यूवर पूर्णपणे सार्वभौम आहे. तो कधीही असावध रहात नाही,तो घटनांबद्दल कधीही आश्चर्यचकित होत नाही. नाही,देव प्रत्येक गोष्ट अगदी सूक्ष्म तपशिलानुसार ठरवतो. हेच सत्य आहे जे अचानक झालेल्या नुकसानीमुळे विदीर्ण झालेल्या हृदयाला शांती आणि विश्रांती देते.
मत्तय १०:२९-३१ म्हणते, “दोन चिमण्या दमडीला विकतात की नाही?तथापि तुमच्या पित्याच्या आज्ञेवाचून त्यांतून एकही भूमीवर पडणार नाही. म्हणून भिऊ नका;पुष्कळ चिमण्यांपेक्षा तुमचे मोल अधिक आहे."
हे एक मौल्यवान आणि गहन सत्य आहे जे शोकाकूल हृदयावर बिंबवण्याची गरज आहे.
जे.सी.रायल लिहितात, “तो मनुष्य आनंदी आहे जो आपल्या प्रभूच्या पावलांवर पाऊल टाकून चालतो आणि म्हणू शकतो, “माझ्यासाठी जे चांगले आहे ते मला मिळेल. माझे काम पूर्ण होईपर्यंत मी पृथ्वीवर राहीन,आणि एक क्षणमात्र जास्त नाही. जेव्हा मी स्वर्गात जाण्यासाठी योग्य होईन तेव्हा मला घेतले जाईल,आणि एक मिनिटही त्यापूर्वी नाही. जोपर्यंत देव परवानगी देतनाही तोपर्यंत जगातील कोणतीही शक्ती माझे जीवन काढून घेऊ शकत नाही. जेव्हा देव मला बोलावतो तेव्हा पृथ्वीवरील सर्व चिकित्सक मला जतन करून ठेवू शकत नाहीत.”
लाजरच्या बाबतीत,बायबल म्हणते "जेव्हा त्याने हे ऐकले,तेव्हा येशू म्हणाला, "हा आजार मृत्यूने संपणार नाही. नाही,तो देवाच्या गौरवासाठी आहे जेणेकरून देवाच्या पुत्राचे गौरव व्हावे."
देवाने तुमच्या विशिष्ट गरजेसाठी तुमच्या प्रार्थनेला होय म्हणणे आणि तुम्हाला त्याचे गौरव दाखवण्यासाठी तुमच्या प्रार्थनेला हो म्हणणे यात फरक आहे. आपण खात्री बाळगू शकतो की येशूच्या अभिवचनावर आपला विश्वास आहे याचा अर्थ आपल्याला एक दिवस समजेल की देवाने आपल्या दुःखाचा उपयोग स्वतःचे गौरव करण्यासाठी कसा केला.
जीवन वेदना देणे सोडणार नाही,परंतु येशू काळजी घेणे सोडणार नाही. जर तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवला तर तो तुम्हाला त्याचे वैभव दाखविल.
लक्षात ठेवा की मृत्यू हा शेवट नाही. हे देखील लक्षात ठेवा की, या शोकांतिकेचा अर्थ असू शकतो यासाठी की मरण निरर्थक ठरणार नाही.
नास्तिक श्रद्धेची शोकांतिका अशी आहे की सर्व काही शेवटी वस्तुनिष्ठपणे निरर्थक आहे. मृत्यू ही अंतिम शोकांतिका बनते,कारण ती जीवनाचा अखेरचा शेवट आहे. पण आमची अंतःकरणे त्याला विरोध करतात. शोकांतिकेतही आपल्याला अर्थ हवा याची आम्हाला इच्छा आहे;गरज आहे आणि सुवार्तेमध्ये तो आहे.
रोम ८:२८ आपल्याला खात्री देते की “परंतु आपल्याला ठाऊक आहे की,देवावर प्रीती करणार्यांना म्हणजे त्याच्या संकल्पाप्रमाणे बोलावलेल्यांना देवाच्या करणीने सर्व गोष्टी मिळून कल्याणकारक होतात."
परमेश्वर या मननाचा उपयोग हे पटवून देण्यासाठी करो,की देव अजूनही सिंहासनावर आहे आणि तुमचे अर्थाने आणि महत्त्वाने भरलेले काही चांगले दिवस अजून पुढे आहेत,कारण तुम्ही त्याला तुमच्या दुखाचा उपयोग इतरांना मदत करण्यासाठी आणि प्रोत्साहन देण्यासाठी करू देत आहात. आणि हे जगण्यासाठी गौरवास्पद आहे.
संक्षिप्त: "देव आपल्या आनंदात आपल्याला कुजबुजतो,आपल्या विवेकबुद्धीशी बोलतो,परंतु आपल्या दुःखात ओरडतो: बधिर जगाला जागृत करणारा हा त्याचा मोठाकर्णा आहे." - सी.एस.लुईस.
प्रार्थना: प्रभु,मी तुझे आभार मानतो की तू अजूनही सिंहासनावर आहेस आणि माझ्या प्रिय व्यक्तीच्या वियोगानंतरही तू तुझ्या नावाचा गौरव करशील आणि माझ्या जीवनाचे काहीतरी सुंदर बनवशील. आमेन
Scripture
About this Plan

जून 2021 च्या शेवटी माझी प्रिय पत्नी देवाघरी प्रभूसोबत राहण्यासाठी गेल्यानंतर प्रभु मला शिकवत असलेले हे धडे आहेत. माझी प्रार्थना आहे की तुम्ही जेव्हा ही मनने कराल तेव्हा परमेश्वर तुमच्या हृदयाला प्रोत्साहन देण्यासाठी त्याचा उपयोग करील. शोक करणे ठीक आहे. प्रश्न पडायला हरकत नाही. पण दु:खातही आशा आहे. ही तुमच्यासाठी जीवनातील एकमेव अटळ गोष्टीसाठी तयारी असू द्या - ती म्हणजे मृत्यू.
More
Related Plans

Connect With God Through Reformation | 7-Day Devotional

I Made It: Joy in the Valley

Breaking Free From an Abusive Marriage

Wellness Wahala: Faith, Fire, and Favor on Diplomatic Duty

Film + Faith - Superheroes and the Bible

Hey Rival: A Biblical Game Plan for Christian Athletes

Romans: The Glory of the Gospel

God Never Quits: God’s Faithfulness When We Fall Short

Finding Strength in Stillness
