रोम 16

16
पौलना मित्रमंडळीले सलाम
1किख्रियामाधला मंडळीनी सेविका, आपली बहिण फिबी हिनी मी तुमले शिफारस करस की; 2तुम्हीन पवित्र जणसले शोभी अस प्रभुमा तिना स्वागत करा, अनी ज्या काममा तिले तुमनी गरज लागी त्यामा तुम्हीन तिले मदत करानं; कारण ती स्वतः बराच जणसले अनं मला बी सहाय्यक व्हयनी. 3#प्रेषित १८:२ख्रिस्त येशुमा मना सहकारी, प्रिस्किल्ला अनं अक्विला यासले सलाम सांगं; 4त्यासनी मना जिवकरता आपला जिव धोकामा टाका, अनी मी एकलाच त्यासना उपकार मानस अस नही, तर गैरयहूदी राष्ट्रमाधला मंडळी पण त्यासना उपकार मानस. 5तसच जी मंडळी त्याना घरमा जमस तिले पण सलाम सांगानं; मना प्रिय अपैनत याले पण सलाम सांगानं; तो ख्रिस्तानाकरता आशिया प्रांतमा प्रथम फळ शे. 6मरीयाले पण सलाम सांगानं; तिनी तुमनाकरता बरीच मेहनत लियेल शे. 7मना नातेवाईक अनं सोबतना बंदिवान अंद्रोनिक अनं युनिया यासले सलाम सांगानं; कारण प्रेषितसमा त्यासनं नाव पहिले शे अनं मना पहिले त्या ख्रिस्तमा व्हतात. 8प्रभुमा मना प्रिय आंप्लियात याले सलाम सांगानं. 9ख्रिस्तमा आमना सहकारी उर्बान अनं मना प्रिय स्ताखु यासले सलाम सांगानं. 10ख्रिस्तमा पसंतीस उतरेल अपिल्लेस याले सलाम सांगानं. अरिस्तबूलना घरमाधला मानसंसले सलाम सांगानं. 11मना नातेवाईक हेरोदियोन याले सलाम सांगानं, नार्सिकना घरमाधला ज्या माणसे प्रभुमा शेतस त्यासले सलाम सांगानं. 12प्रभुमा मेहनत करनारा त्रुफैना अनं त्रुफोसा यासले सलाम सांगानं, प्रिय पर्सिस हिले सलाम सांगानं, तिनी प्रभुमा बराच कष्ट करेल शेतस. 13#मार्क १५:२१प्रभुमा निवडेल रूफ याले, अनी माले मातासमान अशी जी त्यानी माय तिले पण सलाम सांगानं. 14असुंक्रित, फ्लगोन, हर्मेस, पत्रबास अनी हर्मास यासले अनं त्यासनासंगे ज्या भाऊ अनं बहीणी शेतस त्यासले सलाम सांगानं. 15फिललोगस अनं युलिया, नीरिय अनं त्यानी बहिण अनं ओलुंपास यासले सलाम सांगानं, अनी त्यासनासंगे ज्या पवित्रजण शेतस त्या सर्वासले सलाम सांगानं. 16पवित्र चुंबन लिसन एकमेकसले सलाम करानं. ख्रिस्तानं सर्वा मंडळ्या तुमले सलाम सांगतस.
शेवटली सुचना
17आते भाऊ अनं बहिणीसवनं, मी तुमले ईनंती करस की, तुमले जे शिक्षण मिळेल शे त्यानाविरोधमा ज्या फुट पाडतस अनी अडथळा निर्माण करतस, त्यासनावर ध्यान ठेवानं अनं त्यासनापाईन दूर रावानं. 18कारण अस लोके आपला प्रभु ख्रिस्तनी सेवा करतस नही, तर स्वतःना पोटनाकरता सेवा करतस; अनी गोड भाषण करीसन भोळा माणसंसना मनले बहकावतस. 19कारण तुमनं आज्ञापालन सर्वासले माहित व्हयेल शे, म्हणीन मी तुमनाबद्दल आनंद करस; तरी ज्या चांगलं शे, त्याबाबत तुम्हीन ज्ञानी रावानं अनी वाईटना बद्दल साधाभोळा बनी रावानं, अस मनी ईच्छा शे. 20शांतीना देव सैतानले तुमना पायसना खाल लवकरस चेंदी टाकी. आपला प्रभु येशु ख्रिस्त यानी कृपा तुमनासोबत राहो. आमेन.
21 # प्रेषित १६:१ मना सहकारी तिमथ्य अनं मना नातेवाईक लूक्य, यासोन अनं सोसिपेतर ह्या तुमले सलाम सांगतस. 22हाई पत्र लिखिसन देणारा मी तर्तिय तुमले प्रभुमा सलाम सांगस. 23#प्रेषित १९:२९; १ करिंथ १:१४; २ तिमथ्य ४:२०मना सर्वा मंडळीसना आतिथ्य करनारा गायस यानं तुमले सलाम. नगरना खजिनदार एरास्त अनं भाऊ क्वर्त यासना तुमले सलाम. 24आपला प्रभु येशु ख्रिस्त यानी कृपा तुमना सर्वासोबत राहो. आमेन.
देवनी स्तुती
25आते मना सुवार्ताप्रमाणतीन अनी येशु ख्रिस्तना घोषणाप्रमाणतीन जे रहस्य मांगना युगानुयुगमा गुप्त ठेवामा येल व्हतं. 26पण आते प्रकट करामा येल शे अनं संदेष्टासना शास्त्रलेखवरीन सनातन देवनं आज्ञाप्रमाणे ईश्वासना आज्ञापालनकरता सर्वा राष्ट्रसले सांगेल शे त्या रह्स्यनं प्रकटीकरणप्रमाणे जो तुमले स्थिर कराले समर्थ्य शे. 27तो एकच ज्ञानी देव, त्याले येशु ख्रिस्तनाद्वारा युगानुयुग गौरव राहो. आमेन.

ទើបបានជ្រើសរើសហើយ៖

रोम 16: Aii25

គំនូស​ចំណាំ

ចែក​រំលែក

ចម្លង

None

ចង់ឱ្យគំនូសពណ៌ដែលបានរក្សាទុករបស់អ្នក មាននៅលើគ្រប់ឧបករណ៍ទាំងអស់មែនទេ? ចុះឈ្មោះប្រើ ឬចុះឈ្មោះចូល