प्रकटीकरण 14:9-11

प्रकटीकरण 14:9-11 AII25

त्यासना मांगतीन तिसरा देवदूत ईसन मोठातीन बोलना “जो कोणी श्वापदले अनं त्याना मुर्तिनी आराधना करस, अनी आपला कपाळवर किंवा आपला हातवर अशी खुण करी लेस. तो बी देवना क्रोधना प्यालामा शक्तीनी बनायेल क्रोधरूपी द्राक्षरस पि अनी पवित्र देवदूतससमोर अनं कोकरासमोर त्याले अग्नी अनं गंधक यासना पाईन पीडा व्हई. त्यासना पीडाना धूर युगानुयुग वर येस अनी ज्या श्वापदले अनं त्याना मुर्तिले नमन करतस त्यासले अनी जो कोणी त्याना नावनी खुण करी लेस त्यासले रातदिन आराम मिळस नही.”