लूक 1

1
1प्रिय थियफिला,
बराच लोकसनी त्या गोष्टीसबद्दल ज्या आमनामा घडेल शेतस त्यानी माहीती लिखानं कार्य आपला हातमा लेयल शे. 2ठिक त्याच गोष्टी ज्या आमले त्या लोकसपाईन मिळेल शेतस अनी ज्यासनी ह्या गोष्टीसले सुरवातपाईनच दखेल व्हतं अनी त्या शुभवर्तमानना प्रचार करनारा व्हतात. 3यामुये, माले बी वाटस की सर्व गोष्टीसना मुळपाईन नीट शोध करीसन त्या तुमनाकरता एकमांगे एक व्यवस्थित लिखु. 4ज्यामुये तु त्या गोष्टी खऱ्या शेतस हाई समजी ले ज्यानं तुले शिक्षण देयल शे.
बाप्तिस्मा करनारा योहानना जन्मनं भविष्य
5यहूदीयाना राजा हेरोद ह्याना दिनसमा अबीयाना याजकवर्गमाधला जखऱ्या नावना एक याजक व्हता. त्यानी बायको अहरोनना कुळमाधली व्हती, तिनं नाव अलीशिबा व्हतं. 6त्या दोन्ही देवना दृष्टीमा धार्मीक व्हतात अनी प्रभुन्या सर्व आज्ञा अनं विधी खरी भावनातीन पाळाकरता जागरूक व्हतात. 7अलीशिबा वांझ व्हती म्हणीन त्यासले लेकरंबाळं नव्हतात, त्या दोन्ही म्हतारा व्हई जायेल व्हतात.
8एकदाव असं व्हयनं की जखऱ्या आपला वर्गणी येळ येवावर देवपुढे याजकनं कामकरी राहींता, 9तो याजकसना रितप्रमाणे देवना पवित्र मंदिरमा जाईन धुप जाळाकरता चिठ्या टाकीन निवडाई गया 10धुप जाळाना येळले लोकसनी गर्दी बाहेर प्रार्थना करी राहींती. 11तवय देवना दूत धुपवेदीना उजवा बाजुले प्रकट व्हयना. 12त्याले दखीन जखऱ्या घाबरना अनं त्याना थरकाप व्हयना. 13देवदूत त्याले बोलना, “जखऱ्या, घाबरू नको, कारण तुनी ईनंती ऐकामा येल शे; तुनी बायको अलीशिबा हिनापाईन तुले पोऱ्या व्हई, अनी तु त्यानं नाव योहान ठेव. 14तुले आनंद अनं उल्लास व्हई अनी त्याना जन्ममुये बराच लोकसले आनंद वाटी. 15कारण योहान देवना नजरमा महान व्हई, तो ‘द्राक्षरस अनं दारू पेवाव नही,’ अनी तो त्यानी मायना कोखपाईन पवित्र आत्मातीन परीपुर्ण राही, 16तो इस्त्राएलसना बराच जणसले त्यासना देव प्रभु यानाकडे वळाई; 17‘बापसनं मन पोऱ्यासकडे,’ अनी हट्टी लोकसले धार्मीक जणसना ज्ञानकडे फिराईन प्रभुकरता योग्य प्रजा तयार कराले तो एलियानामायक आत्मातीन अनं सामर्थ्यतीन त्यानापुढे चाली.”
18तवय जखऱ्या देवदूतले बोलना, “हाई कसावरीन समजी? कारण मी म्हतारा शे अनं मनी बायको बी म्हतारी शे.”
19देवदूतनी त्याले उत्तर दिधं, “मी देवनापुढे उभा राहणारा गॅब्रीएल देवदूत शे, अनी तुनाबरोबर बोलाले अनं हाई सुवार्ता तुले सांगाकरता माले धाडामा येल शे. 20दख, हाई घडी त्या दिनपावत तु मुका ऱ्हाशी, तुले बोलता येवाव नही; कारण पुर्ण व्हणारं मना वचनवर तु ईश्वास ठेवा नही.”
21ईकडे लोक जखऱ्यानी वाट दखी राहींतात अनं त्याले पवित्र मंदिरमा उशीर लागामुये त्यासले आश्चर्य वाटनं. 22तो बाहेर वना तवय त्याले त्यासनासंगे बोलता ई नही राहींत तवय त्यासले समजनं की त्याले पवित्र मंदिरमा दर्शन व्हयेल शे; तो त्यासले इशारा करीसन गप्प राहीना.
23मंग असं व्हयनं की मंदिरमधला त्याना सेवाना दिन पुरा व्हवावर तो आपला घर गया. 24त्या दिन नंतर त्यानी बायको अलीशिबाले दिन राहीनात अनी ती पाच महीना दपीन राहीनी. 25ती सांगे की, “लोकसमा मनी व्हनारी निंदा बंद व्हवाकरता देवनी मनाकडे दखं तवय मनाकरता त्यानी असं करं!”
कुमारी मरीयाले देवदूतना निरोप
26अलिशिबाना सहावा महीनामा देवनी गालीलमधला नासरेथ नावना गावमा एक कुमारीकडे गॅब्रीएल देवदूतले धाडं. 27#मत्तय १:१८तिनी दावीदना वंश मधला योसेफ नावना माणुससंगे मांगनी व्हयेल व्हती, त्या कुवारीनं नाव मरीया व्हतं. 28तवय देवदूत मझार तिनाकडे ई बोलना, हे कृपा व्हयेल बाई, कल्याण असो! प्रभु तुनासंगे शे, तु धन्य शे.
29मरीया ते बोलनं ऐकीन भलती घाबरी गई अनी हाई अभिवंदन काय व्हई असा ईचार करू लागनी. 30देवदूतनी तिले सांगं, “मरीया, घाबरू नको; कारण देवनी कृपा तुनावर व्हयेल शे. 31#मत्तय १:२१तु गरोदर व्हशी अनं पोऱ्याले जन्म देशी, अनी त्यानं नाव येशु ठेव. 32तो महान व्हई अनं त्याले परमेश्वरना पोऱ्या म्हणतीन. अनी प्रभु देव त्याले त्याना बाप दावीद ह्यानं राजासन दी, 33तो याकोबना घरानावर युगानुयुग राज्य करी; त्याना राज्यना अंत व्हवाव नही!”
34मरीयानी देवदूतले ईचारं, “हाई कसं व्हई? कारण माले पुरूष माहीत नही.”
35देवदूतनी उत्तर दिधं, “पवित्र आत्मा तुनावर ई अनी परमेश्वरनी शक्ती तुनावर छाया करी, याकरता की, जो जन्मी त्याले पवित्र, देवना पोऱ्या, अस म्हणतीन. 36दख, तुनी नातलग अलीशिबा हिले बी म्हतारपणमा गर्भ राहेल शे, अनी जिले वांझ म्हणतस तिले हाऊ सहावा महीना चालु शे. 37अशी कोणतीच गोष्ट नही जी देव करू शकस नही.”
38तवय मरीया बोलनी, “मी प्रभुनी दासी, माले तुना वचनप्रमाणे व्हवो.” अनी देवदूत तिनाकडतीन निंघी गया.
मरीया अलीशिबाले भेटस
39त्याच दिनसमा मरीया फटकामा डोंगराळ प्रदेशमातील यहूदा प्रांतना एक गावमा निंघी गयी. 40जखऱ्याना घरमा जाईन तिनी अलीशिबाले शुभेच्छा दिध्यात. 41तवय असं व्हयनं की अलीशिबानी मरीयानी देयल शुभेच्छा ऐकताच, बाळनी तिना पोटमा उडी मारी, अनं अलीशिबा पवित्र आत्मातीन परीपुर्ण व्हयनी. 42अनी अलीशिबा उच्चा आवाजमा बोलनी, “बायासमा तु धन्य अनं तुनं पोटनं फळ धन्य. 43मनावर हाई कृपा कशी व्हयनी की, मना प्रभुनी माय माले भेटाले वनी? 44तुना शुभेच्छाना शब्द मना कानवर पडताच बाळनी मना पोटमा आनंदतीन उडी मारी. 45जीनी ईश्वास धरा ती धन्य, कारण प्रभुनी तिले सांगेल गोष्टी पुर्ण व्हतीन!”
मरीयानं स्तुती गीत
46तवय मरीया बोलनी,
“मना जिव प्रभुले थोर मानस;
47अनी देव जो मना तारणारा, त्यानामुये मना आत्मा आनंदमा शे,
48कारण त्यानी आपली दासीवर कृपादृष्टी करेल शे!
दखा, आत्तेपाईन सर्व पिढ्या माले धन्य म्हणतीन,
49कारण जो पराक्रमी देव त्यानी मनाकरता महान कार्य करेल शे.
त्यानं नाव पवित्र शे;
50ज्या त्याले मानतस
त्यासनावर त्यानी दया पिढ्यानपिढ्या शे.
51त्यानी आपला हातनी पराक्रम करेल शे
अनी त्यासनी दाणादाण करी टाकेल शे ज्या आपला मनना भावनातीन गर्विष्ट व्हतात.
52त्यानी राजासले राजासनसवरतीन काढेल शे,
अनं नम्र लोकसले उंच करेल शे.
53भूक्यासले त्यानी चांगल्या वस्तु दिसन तृप्त करेल शे,
अनं धनवानसले रिकामी हात धाडी देयल शे.
54त्यानी आमना पुर्वजसंले सांगेल प्रमाणे,
आपला सेवक इस्त्राएल याले मदत करेल शे.
55त्यानी आमना पुर्वजसले सांगेल प्रमाणे अब्राहाम
अनं त्याना संतान यासनावरनी दया सर्वकाळ ध्यानमा ठेवा!”
56मंग मरीया जवळजवळ तीन महीना अलीशिबाजोडे राहीन आपला घर परत गई.
बाप्तिस्मा करनारा योहानना जन्म
57अलीशिबाना दिन भरणात अनं तिले पोऱ्या व्हयना. 58प्रभुनी तिनावर मोठी कृपा करी हाई ऐकीन तिना शेजारना अनं नातलग यासनी तिनासंगे आनंद करा.
59मंग आठवा दिन असं व्हयनं की, बाळनी सुंता कराकरता त्या वनात, अनी त्याना बापना नाववरतीन त्यानं नाव जखऱ्या ठेवणार व्हतात. 60पण त्यानी मायनी सांगं, “नही! त्यानं नाव योहान ठेवनं शे.”
61त्या तिले बोलणात, “तुना नातलगसमा हाई नाव कोणच नही शे!” 62त्यासनी त्याना बापले इशारा करीसन ईचारं, तुनी काय ईच्छा शे त्यानं नाव काय ठेवानं.
63मंग त्यानी पाटी मांगाडीन त्यानं नाव योहान शे अस लिखं, तवय सर्वासले आश्चर्य वाटणं. 64त्याच येळले लगेच त्यानं तोंड उघडनं, त्यानी जिभ मोकळी व्हयनी अनी तो देवना आभार मानीन बोलाले लागना. 65यावर त्यासना आजुबाजू राहनारासमा भिती पसरनी अनी यहूदीया प्रदेशमा पुर्ण डोंगराळ प्रदेशमा या सर्व गोष्टिसबद्दल लोकसमा चर्चा व्हवाले लागनी. 66ज्यासनी ह्या गोष्टि ऐक्यात त्या सर्व आपला मनमा ईचार करीसन बोलणात, हाऊ पोऱ्या व्हई तरी कसा? कारण प्रभुना हात त्यानावर व्हता.
जखऱ्यानी भविष्यवाणी
67योहानना बाप जखऱ्या ह्यानी पवित्र आत्मातीन परिपूर्ण व्हईसन संदेश दिधा, तो असा;
68इस्त्राएलसना देव प्रभु, धन्यवादित शे,
कारण त्यानी आपला लोकसनी भेट लिसन त्यासले मुक्ती देयल शे.
69त्यानी आमनाकरता आपला सेवक
दावीदना घरानामा सामर्थ्यवान उध्दारक देयल शे.
70जसं की त्यानी सुरवात पाईन आपला पवित्र संदेष्टासद्वारे सांगेल व्हतं.
71की, आमना शत्रुसपाईन अनी व्देष करनारासना हाततीन
आमनं तारण व्हई
72यानाकरता की, त्यानी आमना पुर्वजसंवर दया कराले पाहिजे
अनी आपला पवित्र करारनी,
73म्हणजे जी शपथ त्यानी आमना बाप अब्राहाम
याले देयल शे त्यानी आठवण कराले पाहिजे
74ती हाई की तुम्हीन आपला शत्रुसना हातमातीन सुटीन,
75मनासमोर पवित्रतातीन अनं धार्मीकतातीन
आयुष्यभर मनी सेवा नही घाबरता करशात अस मी करसु.
76“अनी हे बाळ, तुले परमप्रधान देवना संदेष्टा म्हणतीन,
कारण प्रभुनी वाट तयार कराकरता
तु त्यानापुढे चालशी,
77यानाकरता की त्याना लोकसले त्यासना पापना माफीघाई
तारणनं ज्ञान देवाकरता.
78आमना देवना परमकृपातीन हाई व्हयेल शे.
म्हणीन आमनावर वरतीन तारणना प्रकाश चमकी
79‘यानाकरता की अंधारमा अनं मृत्युना सावलीमा बशेलसले
तो प्रकाश भेटी’ अनी आमना पाय शांतीना वाटवर चालतिन.”
80तो बाळ वाढीन आत्मातीन बलवान व्हत गया, अनी इस्त्राएलना लोकसले प्रकट व्हवाना दिनपावत जंगलमा राहीना.

ទើបបានជ្រើសរើសហើយ៖

लूक 1: Aii25

គំនូស​ចំណាំ

ចែក​រំលែក

ចម្លង

None

ចង់ឱ្យគំនូសពណ៌ដែលបានរក្សាទុករបស់អ្នក មាននៅលើគ្រប់ឧបករណ៍ទាំងអស់មែនទេ? ចុះឈ្មោះប្រើ ឬចុះឈ្មោះចូល