उत्पती 4

4
काईन अनी हाबेल
1आदाम त्यानी बाई हव्वा हिना पान गया; ती गर्भवती व्हईसन तिनी काईनले जन्म दिधा; ती बोलनी, "परमेश्वराना साहाय्यातीन माले पुरूषसंतान लाभना शे." 2नंतर तिनी त्याना भाऊ हाबेल याले जन्म दिधा. हाबेल मेंढपाळ व्हयना अनी काईन शेतकरी व्हयना. 3काही काळ लोटावर अश व्हयना की, काईननी परमेश्वरले शेतना उत्पनापाईन काही अर्पन आणात. 4#निर्गम 34:19; इब्री 11:4हाबेलनी बी आपला मेंढरंसना कळपसमाईन पहिला जन्मेलसपाईन, म्हणजे त्यामातीन चांगलं चरबीवालं अर्पन आणं, परमेश्वरनी हाबेल अनं त्याना अर्पन यासना आदर करा; 5पण काईन अनं त्यानं अर्पन यासना त्यानी आदर करा नही; म्हणीसन काईन संतापना अनं त्यानं तोंड उतरना. 6तवय परमेश्वर काईनले बोलना: तु का संतापनास? अनी तुनं तोंड का उतरनं? 7तु चांगलं करशी तर तुनी मुद्रा प्रसन्न व्हवावु नही का? पण तु चांगलं करनास नही तर दारनाजोडे पाप टपी बसेल शे, त्याना रोख तुनावर शे, म्हणीन तु त्याले दाबमा ठेव. 8मंग काईननं त्याना भाऊ हाबेल यानासंगे बोलनं व्हयनं; अनी अश व्हयनं की, त्या वावरमा व्हतात तवय काईननी आपला भाऊ हाबेल यानावर चाल करीसन त्याले मारी टाका. 9मंग परमेश्वर देवनी काईनले ईचारं, "तुना भाऊ हाबेल कोठे शे?" तो बोलना, "माले माहित नही; मी काय मना भाऊना राखणदार शे?" 10परमेश्वर काईनले बोलना, "तु हाई काय करं? ऐक! तुना भाऊना रक्त भुमीमाईन माले आवाज दि राहीना शे. 11तर आते तुना हाततीन तुना भाऊनं पडेल रक्त पेवाकरता ज्या भुमीनी तोंड उघाडेल शे, तिना तुले शाप शे; 12तु जमीननी मशागत करशी तवय ती यानापुढे तुले आपला सत्व देवाव नही; तु पृथ्वीवर बेघर अनं भटक्या व्हशी."
13तवय काईन परमेश्वरले बोलना, "हाई मनी शिक्षा माले सहन करता येवाव नही इतली भारी शे. 14दखा, हाई जमीनवरीन माले आज तु हाकली देल शे; मी तुना नजरतीन लपेल ऱ्हासु, मी पृथ्वीवर बेघर अनी भटक्या व्हसु; अनी ज्या कोणले बी मी सापडसु तो माले मारी टाकी अश व्हई."
15परमेश्वर त्याले बोलना, "तर मंग जो कोणी काईनले ठार मारी त्याना सातपट सूड लेवामा ई अनी काईन कोणले सापडना तर त्याले कोणी मारानं नही म्हणीसन त्याले परमेश्वरनी खूण नेमी दिधी."
16काईन परमेश्वरपाईन निंघना अनी एदेनना पुर्वले नोद #4:16 नोद बेघरवालानावना देशमा वस्ती करीन राहिना.
काईननं वंशज
17काईन आपली बाईकोपान गया, अनी ती गर्भवती व्हईन तिले हनोख व्हयना; काईननी एक नगर बांधा; त्या नगरना नाव त्यानी आपला पोऱ्याना नाव वरीन हनोख अश ठेवा. 18हनोखाले इराद व्हयना; इरादले महूयाएल व्हयना; महूयाएलले मथुशाएल व्हयना अनी मथुशाएलले लामेख व्हयना. 19लामेखनी दोन बायका करात; पहिलीनं नाव आदा अनं दुसरीनं नाव सिल्ला. 20आदा हिले याबाल व्हयना; तो तंबु बनाडीसन राहनारा अनं गुरंढोरं पाळनारा यासना मूळपुरूष व्हयना. 21त्याना भाऊना नाव युबाल अश व्हतं; तो तंतुवाद्ये अनं वायुवाद्ये वाजडनारासना सर्वासना मूळपुरूष व्हयना. 22सिल्ला हिले बी तुबल काईन नावना पोऱ्या व्हयना; तो तांबासनी अनी लोखंडनी धारनी सर्वा प्रकारना हत्यारं बनाडनारा व्हयना; अनी तुबल काईनले नामा नावनी बहीण व्हती.
23लामेख आपला बायकासले बोलना, आदा अनी सिल्ला, तुम्हीन मना आवाजकडे ध्यान द्या, लामेखन्या बायकासहो, मना भाषणकडे कान द्या; एक माणुसनी मनावर प्रहार करा म्हणीसन मी त्याले ठार मारी टाकं.
24काईननाबद्ल सातपट सूड लेवाना तर लामेखबद्ल सत्याहत्तरपट लेवामा ई.
शेथना अनी एनोश
25आदाम आपली बायकोपन गया, अनी तिले पोऱ्या व्हयना, त्याना नाव तिनी शेथ ठेवं; ती बोलनी, "काईननी हाबेलना घात करा म्हणीन देवनी त्याना जागी माले दुसरा पोऱ्या देल शे." 26शेथ याले पोऱ्या व्हयना त्यानं नाव त्यानी अनोश अश ठेवात; त्या काळपाईन लोक परमेश्वरना नावतीन आराधना कराले लागनात.

ទើបបានជ្រើសរើសហើយ៖

उत्पती 4: Aii25

គំនូស​ចំណាំ

ចែក​រំលែក

ចម្លង

None

ចង់ឱ្យគំនូសពណ៌ដែលបានរក្សាទុករបស់អ្នក មាននៅលើគ្រប់ឧបករណ៍ទាំងអស់មែនទេ? ចុះឈ្មោះប្រើ ឬចុះឈ្មោះចូល