इफिस 1

1
नमस्कार
1 # प्रेषित १८:१९-२१; १९:१ देवना ईच्छानुसार व्हयेल ख्रिस्त येशुना प्रेषित पौल मनाकडतीन, इफिसना देवना लोके अनं ख्रिस्त येशुवर ईश्वास ठेवणारासले, 2देव आपला पिता अनं प्रभु येशु ख्रिस्त ह्यानापाईन तुमले कृपा अनं शांती असो
ख्रिस्तमा आत्मिक आशिर्वाद
3आपला प्रभु येशु ख्रिस्तना देव अनं पिता धन्यवादित असो. त्यानी स्वर्गमातला सर्व अध्यात्मिक आशिर्वाद दिसन आपलाले ख्रिस्तमा आशिर्वादित करेल शे. 4तसाच आपण त्याना समोर पवित्र अनं निर्दोष ऱ्हावाले पाहिजे म्हणीसन त्याना प्रेमघाई जगनी स्थापना पुर्वी आपलाले ख्रिस्तमा निवडेल शे. 5देवनी आपला मनना संकल्पप्रमाने आपलाले येशु ख्रिस्तपाईन त्याना पोऱ्या व्हवाकरता प्रेमतीन पहिलेच नेमेल शे. 6त्यानी आपला प्रिय पोऱ्या पाईन देवनी देयल कृपाबद्दल आपन त्याना गौरवनी स्तुती कराले पाहिजे. 7#कलस्सै १:१४त्याना कृपाना समृध्दीप्रमाने त्या प्रियकराना ठाई, कारण आपण ख्रिस्तना रक्त द्वारा मुक्त व्हयेल शेतस, म्हणजे आपला पापसनी क्षमा आपलाले मिळेल शे, हाई देवनी कितली महान कृपा शे 8त्यानी सर्व ज्ञान अनं बुध्दी यासनासंगे कृपा बी भरपूर करेल शे. 9देवनी सुरवातले करेल योजनाप्रमाणे त्यानी स्वतःना ईच्छातीन स्वतःनी करेल संकल्पसना गुपित आपलाले सांगात. 10ती योजना अशी की, कालखंडना पुर्णतानी व्यवस्था लावताना स्वर्गमा अनं पृथ्वीवर जे शे ते सर्व पृथ्वीवर एकत्र करीसन ख्रिस्त त्यासना अधिकारी व्हवाले पाहिजे. 11आपला मनना संकल्पप्रमाणे तो सर्व चालाडस त्याना योजनाप्रमाने आम्हीनं पहिलेच नेमेल ख्रिस्तमा नितीमान व्हयेल शेतस 12ह्यानाकरता की, ज्या आम्हीनं ख्रिस्तवर पहिलेच आशा ठेयेल व्हती, ती आमनाकडतीन त्याना गौरवनी स्तुती व्हवाले पाहिजे. 13तुम्हीन सत्यनं वचन म्हणजे तुमना उध्दारबद्दलनी सुवार्ता ऐकी लेवानंतर ख्रिस्तमा ईश्वास ठेवा अनी त्यानी देवाना करेल पवित्र आत्माना तुमनावर त्यानामा शिक्का मारामां येल शे. 14देवना गौरवनी स्तुती व्हवाले पाहिजे म्हणीसन त्याना भरवसाना लोकसनी, खंडणी भरीसन मिळाडेल मुक्तिनाकरता हाऊ पवित्र आत्मा आपला वतनना विसार शे.
पौलनी प्रार्थना
15म्हणीसन तुमनामाधला प्रभु येशुवरना ईश्वास अनी सर्व देवना लोकसकरता तुम्हीन व्यक्त करेल प्रिती यानाबद्दल मी ऐकीसन; 16मी बी तुमनाकरता आभार मानामां खंड पडु देस नही; मी मना प्रार्थनामा तुमनी आठवण करीसन असं मांगस की, 17आपला प्रभु येशु ख्रिस्त याना देव जो वैभवशाली पिता यानी तुमले आपला वळख व्हवाकरता ज्ञानना अनी प्रकटीकरणना आत्मा देवाले पाहिजे; 18म्हणीसन त्यामुये तुमना अंतःकरण प्रकाशित व्हईसन त्याना पाचारणमुये निर्माण व्हनारी आशा कोणती, “पवित्र जणसमा” त्यानी देयल “वतनना” वैभवनी समृध्दी कितली, 19अनी ज्या आपन ईश्वास ठेवनारा त्या आपला विषयना त्याना सामर्थ्यना अपार महत्व ते काय शे हाई तुम्हीन त्याना बलशाली पराक्रमना कृतीवरतीन वळखीन लेवाले पाहिजे. 20त्यानी ती कृती ख्रिस्तमा दखाडीसन त्याले मरेलमातीन ऊठाडं; 21अनी सर्व स्वर्गीय सत्ताधीश, अधिकार, सामर्थ्य, प्रभुत्व अनी भावी युगनं कोणतं बी नाव ल्या, त्या सर्वासतीन त्याले उंच करीसन स्वर्गमा उजवा बाजुले बसाडं. 22#कलस्सै १:१८त्यानी सर्व त्याना पायखाल ठेवं, अनी त्यानी सर्वासवर मस्तक व्हवाले पाहिजे म्हणीसन त्याले मंडळीले दिधं; 23मंडळी हाईच त्यानं शरीर. जो सर्वासनी सर्वकाही भरस त्यानी ती भरेल शे.

ទើបបានជ្រើសរើសហើយ៖

इफिस 1: Aii25

គំនូស​ចំណាំ

ចែក​រំលែក

ចម្លង

None

ចង់ឱ្យគំនូសពណ៌ដែលបានរក្សាទុករបស់អ្នក មាននៅលើគ្រប់ឧបករណ៍ទាំងអស់មែនទេ? ចុះឈ្មោះប្រើ ឬចុះឈ្មោះចូល