२ करिंथ 13

13
अंतिम चेतावणी अनी शुभेच्छा
1हाई मनी तुमनाकडे येवानी तिसरी खेप; दोन किंवा तीन साक्षीदारसना तोंडतीन प्रत्येक गोष्ट ठरस. 2ज्यासनी पुर्वी पाप करं त्यासले अनी दुसरा सर्वासले मी पहिलेच सांगेल व्हतं अनी दुसरांदाव तुमना जोडे असतांना सांगं तेच आते दुर असतांना बी पहिलेच सांगस की, मी फिरीसन वनु तर कोणी किव करावु नही; 3ख्रिस्त मनाद्वारे बोलस यानं सबुत तुमले पाहिजे ते हाईच शे; तो तुमनाबद्दल शक्तीहीन नही, तर तुमनामा शक्तीमान शे; 4त्याले अशक्तपणमा क्रुसखांबवर खियामा वनं तरी तो देवना सामर्थ्यतीन जिवत व्हयेल शे; तसं आम्हीन बी त्यानामा शक्तीहीन शेतस, तरी देवना सामर्थ्यतीन आम्हीन तुमनी सेवा कराकरता जिवत शेतस. 5तुम्हीन ईश्वासमा शेतस किंवा नही यानाबद्दल आपली परिक्षा करा; स्वतःले तपाशी दखा; येशु ख्रिस्त तुमनामा शे अस तुम्हीन स्वतःबद्दल समजतस ना? नही तर तुम्हीन कसोटीमा खरा उतरेल नही शेतस. 6पण मना ईश्वास शे की, तुम्हीन वळखी लेशात, आम्हीन स्वतः तपासनुत अपयस्वी नही निंघनुत. 7आम्हीन देवकडे अशी प्रार्थना करी राहीनुत की तुम्हीन काही वाईट कराले नको, यानाकरता नही की आम्हीन स्वतः खरा दिसाले पाहिजे, पण यानाकरता की तुम्हीन तेच करा की जे चांगलं शे, जरी आम्हीन अपयस्वी ठरनुत तरी चाली. 8कारण सत्यना विरोधमा आमले काहीच करता येस नही, पण सत्यकरता करता येस. 9जवय आम्हीन अशक्त शेतस अनी तुम्हीन शक्तीमान शेतस तवय आम्हीन आनंद करतस, अनी याबद्दल प्रार्थना बी करतस अशी की तुम्हीन परीपुर्ण व्हई जावं. 10यामुये जोडे नसतांना हाई लिखस, याकरता की प्रभुनी जो अधिकार उभा कराकरता माले दिधा, तो पाडाकरता नही; त्या अधिकारतीन जोडे येवावर मी कडकपणा चालवाले नको.
शेवटलं अभिवादन
11भाऊ अनी बहिणीसवन, इतलंच आते म्हणस, तुमनं कल्याण असो; तुम्हीन पुर्ण व्हा; समाधान मिळाडा; एकचित्त व्हा; शांतीतीन ऱ्हा; म्हणजे प्रेमना अनी शांतीना देव तुमनासंगे राही.
12पवित्र प्रेमतीन एकमेकसले सलाम करा.
13देवना सर्व पवित्रजन तुमले सलाम सांगतस. 14प्रभु येशु ख्रिस्तनी कृपा, देवनी प्रिती, अनी पवित्र आत्मानी संगती तुमना सर्वासंगे असो.

ទើបបានជ្រើសរើសហើយ៖

२ करिंथ 13: Aii25

គំនូស​ចំណាំ

ចែក​រំលែក

ចម្លង

None

ចង់ឱ្យគំនូសពណ៌ដែលបានរក្សាទុករបស់អ្នក មាននៅលើគ្រប់ឧបករណ៍ទាំងអស់មែនទេ? ចុះឈ្មោះប្រើ ឬចុះឈ្មោះចូល