१ करिंथ 15

15
मरेल मातीन परत जिवत व्हनं
1भाऊसवन अनी बहिणीसवन, मी तुमले आठवण करी देस की, जी सुवार्ता मी तुमले सांगी, जिना तुम्हीन स्विकार करा, जिनामा तुम्हीन स्थिर शेतस, 2जिनाघाई तुमले तारण मिळेल शे तीच सुवार्ता मी तुमले सांगस, ज्या वचननी तुमले हाई सुवार्ता सांगी त्या वचननुसार ती तुम्हीन पक्की धरी ठेवतस; नही तर तुमना ईश्वास व्यर्थ शे. 3माले जे सांगता वनं ते मी तुमले सांगी दिधं, धर्मशास्त्राप्रमाणे हाई भलतीच महत्वपुर्ण गोष्ट शे की, येशु ख्रिस्त तुमना आमना पापसकरता मरणा. 4#मत्तय १२:४०; प्रेषित २:२४-३२अनं त्याले पुरामा वनं धर्मशास्त्रप्रमाणे तिसरा दिन ऊठना. 5#लूक २४:३४; मत्तय २८:१६,१७; मार्क १६:१४; लूक २४:३६; योहान २०:१९अनी तो पेत्रले अनं बारा जणसले दिसना; 6मंग तो पाचशेसपेक्षा जास्त ईश्वासु दिसनात; त्यानामातीन बराच आजपावत जिवत शे, पण काहीजण मरी गयात. 7त्यानानंतर तो याकोबले, मंग सर्व प्रेषितसले दिसना; 8#प्रेषित ९:३-६अनी जणु काय दिन भराना पहिलेच जन्मलेला जो मी त्या मला सर्वासना शेवट दिसना. 9#प्रेषित ८:३कारण प्रेषितसमा मी धाकला शे; मी प्रेषित म्हणी लेवाना बी लायक नही, कारण मी देवनी मंडळीना छळ करा. 10तरी जो काही मी शे. तो देवना कृपातीन शे; अनी मनावर त्यानी जी कृपा ती व्यर्थ व्हयनी नही; कारण त्या सर्वासपेक्षा मी खुप कष्ट करात. त्या मी करात अस नही, तर मनासंगे राहणारी देवनी कृपानी करात. 11म्हणीन, जर मी राहो, का त्या राहोत, आम्हीन अशी च घोषणा करतस, अनी यानावरच तुम्हीन ईश्वास ठेवा.
आमनं जिवत व्हनं
12आते येशु ख्रिस्त मरेल मातीन ऊठेल शे अशी त्यानाबद्दल घोषणा व्हई राहीनी, तर मरेलसनं पुनरूत्थान व्हस नही, अस तुमनातीन कित्येक जण कसं म्हणतस? 13जर मरेलसनं पुनरूत्थान व्हस नही, तर ख्रिस्त बी ऊठना नही; 14अनी ख्रिस्त ऊठना नही तर आमनी घोषणा बी व्यर्थ अनं तुमना ईश्वास बी व्यर्थ 15अनी आम्हीन देवबद्दल खोटी साक्ष अस व्हयनुत; कारण देवबद्दल आम्हीन अशी साक्ष दिधी की त्यानी ख्रिस्तले ऊठाडं; पण जर मरेलसले ऊठाडामा नही येस तर त्यानी त्याले ऊठाडं नही. 16मरेलसले ऊठाडामा नही येस तर ख्रिस्तले बी ऊठाडामा नही वनं 17ख्रिस्त ऊठना नही तर तुमना ईश्वास निष्फळ शे; तुम्हीन अजुन तुमना पापमा शेतस; 18मंग तर त्या बी ज्या ख्रिस्तमा मरणात त्यासना नाश व्हयना. 19जर आम्हीन फक्त ह्याच जिवनमा ख्रिस्तमा आशा धरेल शे तर मंग सर्व माणससपेक्षा आपण लाचार शेतस.
20तरी बी ख्रिस्त तर मरेलस मातीन ऊठाडेल शे, अनं ज्या झोपेल शेतस त्यासनामातीन तो पहिलं फळ शे. 21एक माणुसकडतीन मरण वनं, म्हणीसन एकच माणुसकडतीन मरेलसनं पुनरूत्थान बी शे. 22जसं आदामनी सर्वासवर मरण आनं, तसं ख्रिस्तमा सर्वासले जिवत करामा ई. 23पण प्रत्येक आपआपला कामप्रमाणे; पहिले ख्रिस्त मरेल मातीन ऊठना; मंग ख्रिस्तना येवाना येळले ज्या त्यानावर ईश्वास करतीन त्या लोके जिवत व्हतीन. 24यानानंतर शेवट व्हई, तवय शासन करनारा सर्व दुष्ट आत्मा, त्यासना सर्व अधिकार, अनं सामर्थ्य याना नाश ख्रिस्त करी अनी त्यानानंतर तो देवबापले राज्य सोपी दि. 25कारण जोपावत ख्रिस्त सर्व शत्रुसले त्याना पायखाल आनावु नही, तोपावत त्याले राज्य करनंच शे. 26शेवटना शत्रु जो मृत्यु तो नष्ट करामा ई. 27कारण शास्त्र म्हणस “देवनी सर्व वश करीसन येशुना पायखाल ठेयं;” पण सर्व वश करेल शे अस जवय सांगं तवय, ज्यानी त्याले सर्व वश करी दिधं, पण त्या सर्वमा तो स्वतः नव्हता. 28त्याले सर्वकाही वश व्हयना अस जवय व्हई तवय ज्यानी त्याले सर्व वश करी दिधं त्याले पोऱ्या बी स्वतः परमेश्वरले वश व्हई; याकरता की परमेश्वर सर्वासवर राज्य करी. 29अस नही तर मरेलसकरता ज्या बाप्तिस्मा लेतस त्या काय करतीन? जर मरेलसले ऊठाडामा नही येस तर त्यासनाबद्दल त्या बाप्तिस्मा का बर लेतस? 30आम्हीन प्रत्येक येळले संकटमा का बर पडतस? 31भाऊसवन अनी बहिणीसवन, तुमनाबद्दल जो गर्व माले ख्रिस्त येशु आपला प्रभुमा शे, त्यावरून मी म्हणस की, मी रोज रोज मरस; 32इफिस गावमा मी जंगली जनावरसना मायक लोकससंगे मी लढाई करनु, ती मनुष्यना साधारण हेतुतीन करतु तर माले काय फायदा? मरेलसले ऊठाडामा येस नही, तर चला आपण खाऊत, पिऊत, कारण सकाय मरनच शे.
33फसु नका, खराब संगतमा नीति बिघडस. 34धार्मीकताबद्दल शुध्दीवर या, अनी पापले सोडा; कारण बराच जणसले देवबद्दल ज्ञान नही; तुमले लाज वाटाले पाहिजे म्हणीन मी हाई बोलस.
परत जिवत व्हनारासनं शरीर
35आते कोणी सांगी, मरेल कशा ऊठाडाई जातस, अनं त्या कोणता प्रकारना शरीरतिन येतस? 36अरे बिनबुध्दीना माणुस, जे तु पेरस ते मरस नही तोपावत जिवत नही व्हस. 37अनी तु जे पेरस तर त्याना फक्त दाणा पेरस, पुरं रोपटं नही, मंग तो गहुना राहो का दुसरा कसाना बी राहो; 38देव त्याना ईच्छानुसार त्याले त्यानं शरीर देस; म्हणजे प्रत्येक बीले स्वतःनं योग्य शरीर देस. 39सर्व शरीर मायकच नहीत; तर माणुसनं शरीर हाऊ एक प्रकार, प्राणीसनं शरीर हाऊ एक प्रकार अनं मासासनं शरीर हाऊ एक प्रकार.
40तसच स्वर्गना शरीर अनं जगना शरीर शेतस; पण स्वर्गवालासनं तेज एक, अनं जगवालासनं तेज एक. 41सूर्यनं तेज येगळं; चंद्रनं तेज येगळं; तारासनं तेज येगळं; तारातारासना तेजमा फरक शे.
42तसं मरेलसन पुनरूत्थान शे, ते विनाशीपणमा पेराई जास; अविनाशीपणमा ऊठाडाई जास; 43अपमानसंगे पुराई जास; गौरवमा ऊठाडाई जास; अशक्तपणमा पुराई जास, सामर्थ्यमा ऊठाडाई जास; 44प्राणमय शरिरले असे पुराई जास; अध्यात्मिक शरिरले अस ऊठाडाई जास, जर प्राणमय शरीर शे, तर आध्यात्मिक शरीर शे. 45तसाच शास्त्रलेख शे की, पहिला माणुस आदामले जिवत प्राणी अस बनाडं, शेवटला आदाम जिवन देणारा आत्मा शे. 46तरी ज्या अध्यात्मिक त्या पहिला नहीत; शारिरीक त्या पहिला शेतस, त्यानानंतर ज्या अध्यात्मिक त्या शेतस. 47पहिला माणुस आदाम मातीना शे, दुसरा माणुस स्वर्गपाईन शे. 48तो जशा मातीना व्हता तसा ज्या मातीना त्या बी शेतस; अनी तो स्वर्ग माधला जशा शे तसच ज्या स्वर्ग माधला त्या बी शेतस; 49अनी जो माटिना त्यानं शरीर जसं आपण धारण करं, तस जो स्वर्ग माधला त्यानं बी रूप धारण करसुत. 50भाऊ अनं बहिणीसवन मी अस म्हणस की, मांस अनं रंगत ह्यासले देवना राज्यमा प्रवेश मिळु शकस नही; अनी विनाशीपणले अविनाशीपणमा प्रवेश मिळु शकस नही 51#१ थेस्सलनी ४:१५-१७मी तुमले एक गुप्त गोष्ट सांगस; आपण सर्वाच मराऊत नही, पण आपण सर्व बदली जासुत, 52क्षणमा, शेवटला कर्णाना येळले कर्णा वाजी, मरेल त्या अविनाशी शरिरमा असा ऊठतीन, अनी आपण बदली जाऊत, कारण हाई जे विनाशी त्यानी अविनाशीपण परिधान करानं. 53अनी हाऊ जो मृत शरीर शे त्यानी अमरत्व परिधान कराले पाहिजे हाई आवश्यक शे. 54अस जो शास्त्रलेख पुर्ण व्हई, हाई जो विनाशी त्यानी अविनाशीपण परिधान करा, अनी हाई जो मर्त्य त्यानी अमरत्व परिधान करा, अस जवय व्हई, “तवय मरणना नाश व्हईसन; विजय हाऊ पुर्ण व्हयना!” 55“अरे मरण, तुना जिंकणं कोठे शे? अरे मरण, तुना नांगा कोठे शेतस?” 56मरणना नांगा पाप; अनी पापनं बळ मोशेना नियम शेतस, 57तरी जो देव आपला प्रभु येशु ख्रिस्त कडतीन आपलाले जिंकाडस त्यानी स्तुती असो. 58यामुये मना प्रिय भाऊ अनी बहिणीसवन, प्रभुमा तुमनं कष्ट व्यर्थ नही, हाई तुमले माहीत शे, म्हणीसन तुम्हीन स्थिर रहा, टिकी रहा, अनी प्रभुना काममा कायम वाढत जा.

ទើបបានជ្រើសរើសហើយ៖

१ करिंथ 15: Aii25

គំនូស​ចំណាំ

ចែក​រំលែក

ចម្លង

None

ចង់ឱ្យគំនូសពណ៌ដែលបានរក្សាទុករបស់អ្នក មាននៅលើគ្រប់ឧបករណ៍ទាំងអស់មែនទេ? ចុះឈ្មោះប្រើ ឬចុះឈ្មោះចូល