तर मंग आपण येवढा मोठला साक्षरूपी ढगसघाई इतला घेरायेल शेतस म्हणीसन आपण बी सर्व दडपण अनी सहज आपले गुंताई लेणारं पाप टाकीसन, तर या आपले नेमी देयल धावमा धीरतीन पळाले पाहिजे. आपण आपला ईश्वासना उत्पन्नकर्ता अनी तो ईश्वास पुरा करणार येशु यानाकडे दखत ऱ्हावानं. त्यानापुढे जो आनंद ठेयल व्हता त्याले तुच्छ मानीसन क्रुसखांब सहन करा अनी तो देवना राजासनना उजवीकडे बठेल शे.