परमेश्वर त्या वेदीवरना सुवास लिसन आपला मनमा बोलना, मानवमुये मी आठेनपुढे भुमीले कधीच शाप देवाव नही; कारण मानवना मनमाधल्या कल्पना जन्मपाईनच दुष्ट ऱ्हातस; तर मी आत्ताना सारखा परत सर्वा जिवसना नाश करावु नही. पृथ्वी राही तोपावत पेरणी अनं कापणी, थंडी अनं ऊन, उन्हाळा अनं हिवाळा, दिन अनं रात हाई व्हवाशिवाय ऱ्हावावुत नही.