मंग देव बोलना, "आपला प्रतिरूपना अनं आपलासारखा दिसनारा अस मनुष्य आपण बनाडूत; समुद्रमाधलं मासा, आकाशमाधलं पक्षी, ग्रामपशु, सर्वी पृथ्वी अनी पृथ्वीवरला रांगनारा सर्वा प्राणी यासनावर त्या सत्ता करतीन." देवनी आपला प्रतिरूपना मनुष्य बनाडं; देवना प्रतिरूप अस तो बनाडामा वना, नर अनं नारी अस त्या बनाडाई गयात.