YouVersion Logo
Search Icon

स्तोत्रसंहिता 115

115
देव आणि मूर्ती
1हे परमेश्वरा, आमचे नको, आमचे नको, तर आपल्या नावाचा गौरव कर, कारण तू दयाळू व सत्य आहेस.
2“ह्यांचा देव कोठे आहे;” असे राष्ट्रांनी का म्हणावे?
3आमचा देव स्वर्गात आहे; त्याला योग्य दिसते ते सर्व तो करतो.
4त्यांच्या मूर्ती केवळ सोनेरुपे आहेत; त्या मनुष्यांच्या हातच्या कृती आहेत.
5त्यांना तोंड आहे पण बोलता येत नाही; त्यांना डोळे आहेत पण दिसत नाही;
6त्यांना कान आहेत पण ऐकू येत नाही; त्यांना नाक आहे पण वास येत नाही;
7त्यांना हात आहेत पण स्पर्श करता येत नाही; पाय आहेत पण चालता येत नाही; त्यांच्या कंठांतून शब्द निघत नाही.
8त्या बनवणारे व त्यांच्यावर भाव ठेवणारे सर्व त्यांच्यासारखे बनतात.
9हे इस्राएला, परमेश्वरावर भाव ठेव; तोच त्यांचा साहाय्यकर्ता व त्यांची ढाल आहे.
10हे अहरोनाच्या घराण्या, परमेश्वरावर भाव ठेव; तोच त्यांचा साहाय्यकर्ता व त्यांची ढाल आहे.
11अहो परमेश्वराचे भय धरणार्‍यांनो, परमेश्वरावर भाव ठेवा, तोच त्यांचा साहाय्यकर्ता व त्यांची ढाल आहे.
12परमेश्वराने आमची आठवण केली आहे; तो आशीर्वाद देईल, इस्राएलाच्या घराण्याला आशीर्वाद देईल, अहरोनाच्या घराण्याला आशीर्वाद देईल.
13परमेश्वराचे भय धरणार्‍या लहानथोरांना तो आशीर्वाद देईल.
14परमेश्वर तुमची अधिकाधिक वाढ करो, तुमची व तुमच्या मुलांची वाढ करो.
15आकाश व पृथ्वी ही निर्माण करणार्‍या परमेश्वराचा तुमच्यावर आशीर्वाद असो.
16स्वर्ग तर परमेश्वराचा आहे; पण पृथ्वी त्याने मानवजातीला दिली आहे.
17मेलेले म्हणजे निःशब्दस्थानी उतरलेले कोणीही परमेशाचे स्तवन करीत नाहीत;
18पण आम्ही येथून पुढे सर्वकाळ परमेशाचा धन्यवाद करीत राहू. परमेशाचे स्तवन करा!1

Highlight

Copy

Compare

Share

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in

Videos for स्तोत्रसंहिता 115