YouVersion Logo
Search Icon

स्तोत्रसंहिता 114

114
आश्‍चर्यकारक निर्गमन
1इस्राएल मिसर देशातून निघाला, याकोबाचे घराणे परकी भाषा बोलणार्‍या लोकांतून निघाले,
2तेव्हा यहूदा त्याचे पवित्रस्थान झाला, इस्राएल त्याचे राज्य झाला.
3हे पाहून समुद्र पळाला; यार्देन मागे हटली.
4पर्वतांनी मेंढ्यांसारख्या आणि टेकड्यांनी कोकरांसारख्या उड्या मारल्या.
5हे समुद्रा, तुला काय झाले म्हणून तू पळतोस? हे यार्देने, तुला काय झाले म्हणून तू मागे हटतेस?
6अहो पर्वतांनो, तुम्हांला काय झाले म्हणून तुम्ही मेंढ्यांसारख्या उड्या मारता? अहो टेकड्यांनो, तुम्हांला काय झाले म्हणून तुम्ही कोकरांसारख्या उड्या मारता?
7हे पृथ्वी, तू प्रभूसमोर, याकोबाच्या देवासमोर, थरथर काप.
8तो खडक पालटून पाण्याचे तळे करतो, गारेचा खडक पालटून पाण्याचा झरा करतो.

Highlight

Copy

Compare

Share

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in

Videos for स्तोत्रसंहिता 114