चिंतेला तिच्या स्वतःच्या खेळात पराभूत करणेSample

एका वेळी एक दिवस
प्रत्येक दिवसाचे स्वतःचे संघर्ष असतात. आपण सहमत आहात की नाही याची खात्री नाही परंतु ते सत्य आहे. दररोज नवीन आशीर्वाद असतात ज्या आपल्याला घरातल्या, कामाच्या ठिकाणी, मुलांबरोबर, कुटुंबातील इतर सदस्यांसाठी आणि मैत्रीच्या नवीन आव्हानांसाठी आवश्यक असतात. यासाठी आपल्याला मुलभूतपणे प्रत्येक दिवस उतार चढाव, वर खाली, नुकसान आणि नफा, येतो तसा घेण्याची आवश्यकता आहे. जेव्हा आपण दुसर्या दिवशी, आठवड्यात किंवा महिन्यात काय साध्य केले पाहिजे याचा विचार करतो तेव्हा आपल्या अंतःकरणात पुष्कळ वेळा चिंता निर्माण होते. येशू, देहामध्ये देव स्वत: असे म्हणाला की भविष्याबद्दल काळजी करणे व्यर्थ आहे. मत्तय 6 मध्ये त्याने आपले लक्ष रानातील फुले व हवेत उडणाऱ्या पक्ष्यांकडे आकर्षित केले जाते तसे जीवन जगतात. काही चिंता नाही, धडपड नाही, फक्त जगण्यासाठी जे जीवन त्यांना देण्यात आले आहे ते जीवन जगणे. 1 पेत्र 5 वचन 7 मध्ये म्हटले आहे: “त्याच्यावर तुम्ही आपली सर्व चिंता टाका कारण तो तुमची काळजी घेतो”. हे किती सुंदर प्रोत्साहन आहे – जगाचे वजन आपल्या खांद्यावर न घेता निश्चिंतपणे जगणे. यामुळे आपला प्रत्येक दिवस या ठाम विश्वासाने सुरु कारण्यास आपली मदत होईल की देव आपल्या आधी आपल्या दिवसात गेला आहे आणि तो आपला पाठीराखा आहे. हे आपल्याला आपला प्रत्येक दिवस या विश्वासाने संपविण्यात मदत करते की येणारा दिवस कितीही भीतीदायक असला तरी तो आपली काळजी घेईल कारण तो काळाच्या पलीकडे अस्तित्वात आहे आणि त्याला सर्व काही ठाऊक आहे. याचा अर्थ असा आहे की माझ्याकडे जे येईल त्याचा सामना करण्यास तो मला शहाणपणा, अडथळ्यांना सामोरे जाण्यासाठी सामर्थ्य आणि चांगले काम करण्याचे धैर्य देईल. आपल्याला असे आढळेल की एका वेळी एक दिवस घेत असतांना आपण हे शिकतो की आपण आपल्या प्रत्येक क्षणात कसे हजर राहावे आणि त्याचा आनंद कसा घ्यावा. जेव्हा चिंता आपल्या जीवनावर ताबा घेते तेव्हा आपल्या जीवनात विणलेल्या साध्या आनंदांचा आपण आनंद घेत नाही, आपण शारीरिकरित्या उपस्थित असतो परंतु आपल्या आजूबाजूच्या लोकांच्या जीवनातून अनुपस्थित असतो. नात्यांना त्रास होतो आणि बर्याचदा परिणामी आपले आरोग्य बिघडते. आपल्या खिडकीच्या मागे उडणाऱ्या पक्ष्यांची किंवा आपल्या बागेत डौलदारपणे वाढणाऱ्या फुलांचे, चित्र आपल्या मनात कैद करा आणि आपल्या आयुष्यातील प्रत्येक सेकंदाचा आनंद घ्या. आपण एखाद्याला कशा प्रकारे आशीर्वादित किंवा प्रोत्साहित करू शकता ह्याचा विचार करून आपला प्रत्येक दिवस जगा. आपल्याकडे जगण्यासाठी एक जीवन आहे, आपण ते कसे जगतो हे आपल्यावर अवलंबून आहे. चिंता ही एक शेवटचा रस्ता नसून, हा एक छोटासा आडमार्ग आहे जो आपल्याला आपल्या जीवनाच्या महामार्गावर परत नेईल, जर आपण उद्याची चिंता केली नाही तर. आपण स्वत: ला हळू करून आपल्या दिवसाचा आनंद घेण्यासाठी तयार आहात का?
प्रार्थनाः
प्रिय प्रभू,
मला दाखविलेल्या प्रत्येक दिवसाबद्दल धन्यवाद. मी जीवन, आरोग्य आणि सामर्थ्याबद्दल आभारी आहे. मला या दिवसाचा संपूर्ण आनंद घेण्यासाठी मदत कर - उद्याची चिंता दूर कर आणि त्याऐवजी मला विश्वासाने भर.
येशूच्या नावात
आमेन
About this Plan

चिंता तिच्या सर्व प्रकारांद्वारे आपल्याला दुर्बल करणारी अशी ठरू शकते. कारण ती आपले संतुलन घालवू शकते आणि आपल्याला भीतीमध्ये बांधून ठेवू शकते. हा कथेचा शेवट नाही, कारण येशूमध्ये आपल्याला स्वातंत्र्य आणि संघर्षावर मात करण्याची कृपा मिळते. आपण त्यावर केवळ मात करू शकत नाही, परंतु आपण त्यासाठी अधिक चांगले केले जाऊ शकतो देवाच्या वचनाचे आणि आश्वसन देणाऱ्या त्याच्या सतत उपस्थितीसाठी त्याचे आभार.
More
Related Plans

Speak Life

Come and See: An Invitation to Meet Jesus

Pray Bad

When God Doesn’t Fix It (And Other Honest Prayers)

Face Your Fears 10 Day Devotional

Scripture-Based Prayers for Spiritual Warfare

Silence. Surrender. Speak.

Keys to Answered Prayer

Thy Kingdom Come - Prayer Journal
