YouVersion लोगो
सर्च आयकॉन

रानाचा चमत्कारनमुना

रानाचा चमत्कार

6 पैकी 4 दिवस

तुमचे हात भटकू देऊ नका

याकोबाचा अकरावा पुत्र योसेफ याला रानाचा अनुभव आला. त्याने वेळेपूर्वीच आपल्या कुटुंबास आपल्या स्वप्नांविषयी सांगितले आणि त्याला मिसर देशास जाणाऱ्याव्यापाऱ्यांसविकून टाकण्यात आले. मग त्याने स्वतःला पोटीफरच्या घरी गुलाम म्हणून पाहिले आणि त्याला प्रामाणिकपणाचे प्रतिफळ मिळण्याऐवजी त्याच्यावर बलात्काराचा आरोप लावण्यात आला आणि त्याला बंदीगृहात टाकण्यात आले. बंदीगृहात, जरी त्याने फारोच्या अधिकाऱ्याची मदत केली, तरीही 2 वर्षेपर्यंत तो बंदीगृहात राहिला आणि शेवटी त्याला फारोकडे आणण्यात आले आणि तो रातोरात मिसर देशचा राज्यपाल नेमण्यात आला. रानातील त्याचे जीवन 13 वर्षे टिकले आणि तरीही त्या सर्व यातना आणि गैरसमजूतीतही त्याने कधीही आपला हेतू गमावला नाही. तो जेथे कोठे गेला, तेथे त्याने इतरांची सेवा करण्याचा मार्ग शोधून काढला आणि तो उत्कृष्ठ ठरला ज्याचे कारण देवासोबत त्याचे नाते होते.

आमच्यापैकी अनेकांसाठी, रान आम्ही करत असलेल्या आणि करण्याची इच्छा धरणाऱ्या सर्व कामातून आमचा आनंद हिसकावून घेईल. आम्हास वाटू लागेल की काहीही करण्यात अर्थ नाही कारण त्यातून काहीही निष्पन्न होणार नाही. हे महत्वाचे आहे की त्या भावनेत तुम्ही लबाडी ओळखावी. रानातही, तुमच्या जीवनाचा हेतू आहे. तुम्हाला जे करण्यासाठी देण्यात आले आहे त्यात तुमचे हात गुंतलेले असतील तर तुम्ही लोकांच्या जीवनांवर छाप सोडून जाल. प्रेषित पौलाने सर्व विश्वासणाऱ्यांस प्रोत्साहन दिले की त्यांनी स्वतःची उपजीविका चालविण्यासाठी काम करावे. त्याने आळसीपणा आणि वायफळ बोलण्यास प्रोत्साहन दिले नाही. त्याने त्यांना आग्रह केला की त्यांनी सर्वकाही देवाच्या गौरवासाठी करावे. ज्या गोष्टी करण्यास देव तुम्हाला प्रेरित करतो अथवा तुमचे मन वळवतो त्या करीत राहावे. जरी तुमचा आशीर्वाद अद्याप आला नसेल तरीही इतरांसाठी तुम्ही जो आशीर्वाद बनू शकता तो आशीर्वाद फेटाळून लावू नका. विसावा घ्या पण जेव्हा तुम्ही काम केले पाहिजे तेव्हा काम करा. जशी सेवा तुम्ही करू शकता तशी सेवा करण्याच्या तुमच्या समर्पणावर देवाचे राज्य अवलंबून आहे.

योसेफाच्या व्यावसायिक उत्कृष्टतेमुळे आणि त्याच्या कामाच्या नीतिमत्तेमुळे तो गुलामांच्या गर्दीत उठून दिसला. तुमच्या अरण्यातही तुम्ही तोच आशीर्वाद आणि कृपा अनुभवू शकता कारण देव तुम्ही केलेला प्रत्येक त्याग पाहतो आणि तुम्ही जे करता ते करण्यासाठी तुम्ही किती किंमत मोजता हे तो जाणतो.

या योजनेविषयी

रानाचा चमत्कार

येशूचा प्रत्येक अनुयायी स्वतःला अनिवार्यपणे ज्या रानात पाहिल, तो पूर्णपणे वाईट नाही. ते देवाच्या अगदी जवळचे स्थान असू शकते आणि आमच्या जीवनात त्याच्या हेतूंची अधिक स्पष्टता. या लेखनाद्वारे तुमच्या रानातील ऋतूच्या चमत्कृतीप्रत तुमचे डोळे उघडण्याची आशा केली जाते.

More

ही योजना प्रदान केल्याबद्दल आम्ही Christine Jayakaran चे आभार मानू इच्छितो. अधिक माहितीसाठी, कृपया भेट द्या: www.instagram.com/christinejayakaran