YouVersion लोगो
सर्च आयकॉन

रानाचा चमत्कारनमुना

रानाचा चमत्कार

6 पैकी 1 दिवस

रानाचा सामना करणे

रान हा असा एक ऋतू आहे ज्यात येशूच्या प्रत्येक अनुयायास त्याच्या आयुष्यात कमीतकमी एकदा तरी वाटचाल करावी लागते. रान हा असा समय असतो जो दीर्घ प्रतीक्षा, दीर्घकाळपर्यंत बंद दारे आणि खूप निराशा यांनी चिन्हांकित असतो. हा ऋतू शिक्षा नसून पुढे काय आहे याची तयारी असते. देव इस्राएली लोकांस चाळीस वर्षांचा प्रवासात रानातून घेऊन गेला ज्याचा स्पष्ट हेतू बंडखोर आणि विश्वास न करणाऱ्या पीढीच्या लोकांस उपटून टाकणे हा होता. त्यांच्या वचनदत्त देशात जो दहा दिवसांचा प्रवास असावयास हवा होता, जो देवाने त्याच्या लोकांसाठी काटेकोरपणे योजिला होता,तो चाळीस वर्षांच्या वळणाच्या प्रवासातबदलला. या रानातील प्रवासादरम्यान, देव कधीही दूर नव्हता तर त्यांच्या अगदी बाजूस आणि त्यांच्यामध्ये होता. तो अजूनही मोशेद्वारे आणि नंतर यहोशवाद्वारे त्यांच्याशी जवळून संवाद साधत होता. तो त्यांच्या दैनिक जीवनात सक्रियपणे सहभागी होता आणि त्यांच्याप्रत त्याच्या अढळ समर्पणात सारखाच गुंतलेला होता.

रानाची समस्या ही आहे की ती कधी न संपणारी कठोर आणि जीवघेणी दुष्काळासारखी परिस्थिती वाटू शकते. नातेसंबंधांत संघर्ष असू शकतो, आर्थिक स्थिती सामान्यपेक्षा अधिक तंग वाटू शकते, जेव्हा तुम्ही अगदी जवळून नैराश्य आणि हताशा याकडे पाहालतुमचे आरोग्य खडतर आणि अस्थिर वाटेल. तुम्ही तुमच्या स्वतःच्या रानातील प्रवासाकडे जवळून पाहाल तेव्हा तुम्हाला आढळून येईल की देव शांततेत अनुपस्थित नाही आणि तुमच्या भयानक परीक्षांतही तो दूर नाही पण तो तुमच्यासोबत राहतो आणि जेव्हा तुम्हाला पराभूत झाल्यासारखे वाटते तेव्हा तो तुम्हाला उचलून धरतो. तो त्याच्या वचनाबाबत खरा आहे जेव्हा तो म्हणतो, “मी तुम्हास कधीही सोडणार नाही किंवा टाकणार नाही.”

कदाचित तुम्हाला तुमच्या रानाच्या बोगद्याच्या शेवटी प्रकाश दिसणार नाही पण तुम्ही ही खात्री बाळगू शकता की जगाच्या प्रकाशाचा प्रवास पावलोपावली तुमच्यासोबत आहे. तुमच्या सर्वात एकाकी क्षणांमध्ये तुम्हाला त्याच्या हृदयाचे ठोके जाणवतील. जेव्हा तुमच्याभोवती घोंघावणारे वारे वाहत असतील तेव्हा तुम्हाला त्याचे अतुल्य सामर्थ्य जाणवेल. तुमच्या सर्वात मोठ्या हृदयवेदनेत आणि निराशेत तुम्हाला त्याची दया दिसून येईल.

म्हणून आशा सोडू नका. जेव्हा तुम्ही स्वतःला रानात पाहता, तेव्हा सर्वांच्या प्रभूचा धावा करा. तो टेकडी, खोरी, वाळवंट आणि उद्यानांचा परमेश्वर आहे. तुम्हाला प्रेमाने आणि हळूवारपणे पुढच्या ऋतूत नेत असतांना तो तुमच्या साम्प्रत ऋतूस अर्थपूर्ण करण्यात मदत करील.

पवित्र शास्त्र

या योजनेविषयी

रानाचा चमत्कार

येशूचा प्रत्येक अनुयायी स्वतःला अनिवार्यपणे ज्या रानात पाहिल, तो पूर्णपणे वाईट नाही. ते देवाच्या अगदी जवळचे स्थान असू शकते आणि आमच्या जीवनात त्याच्या हेतूंची अधिक स्पष्टता. या लेखनाद्वारे तुमच्या रानातील ऋतूच्या चमत्कृतीप्रत तुमचे डोळे उघडण्याची आशा केली जाते.

More

ही योजना प्रदान केल्याबद्दल आम्ही Christine Jayakaran चे आभार मानू इच्छितो. अधिक माहितीसाठी, कृपया भेट द्या: www.instagram.com/christinejayakaran