रानाचा चमत्कारनमुना

तुमचे अंतःकरण भटकता कामा नये
आमची बहुतांशी युद्धे आमच्या मनात घडतात आणि ती मनात जिंकली जातात किंवा पराभूत होतात. हा विश्वास तुम्ही धरू शकता का? तुम्हाला तुमचे तोंड देखील उघडण्याची गरज नाही किंवा तुमची हानी अथवा विजय ठरविण्यासाठी पाऊल पुढे टाकण्याची गरज नाही. पृथ्वीवरील सर्वात अंधकारमय जागी प्रवेश करण्यासाठी अथवा तुमच्या मनाला लगाम लावण्यासाठी आणि तुमचे विचार उच्च भूमीवर नेण्यासाठी तुम्हाला फक्त तुमच्या मनाला अनावर होऊ द्यावे लागेल. जर तुमच्या अंतःकरणात राग असेल, तर तुमचे मन लगेच लोकांवर राग आणि द्वेषपूर्ण निंदा ओकू लागेल. जर दुःखाने तुमच्या आत्म्यावर दुर्गुणांसारखा ताबा घेतला असेल, तर तुम्ही खात्री बाळगू शकता की लवकरच तुमचा प्रत्येक विचार विनाशकारी होईल आणि तुमच्या सभोवतालच्या सर्व लोकांसाठी निराशा आणि विनाश आणेल. जर तुम्हाला स्वतःची कीव येत असेल, तर तुम्ही अशा लोकांवर कटुत्व आणि संताप व्यक्त करू लागाल ज्यांनी कधीही तुमचे नुकसान केले नाही.
रान इतर कुठल्याही गोष्टीच्या तुलनेत तुमच्या अंतःकरणाची व मनाची दशा उघडकीस आणील. तुमच्या सभोवतालच्या सर्व नकारात्मक परिस्थिती तुम्हाला तुमच्या मनातील अशा मार्गांवर भटकून जाण्यास प्रेरित करतील ज्या मुळीच आरोग्यदायक नाहीत. तुम्ही देवावर, त्याच्या वचनावर, त्याच्या अभिवचनांवर, तुम्ही कोण आहात असे तो म्हणतो आणि या काळात तो काय करीत आहे यावर शंका करू लागता. एकमेव समाधान आहे तुमच्या मनाचा पूर्ण कायापालट करणे.
कायापालटचा अर्थ काय आहे? तुम्हाला सर्व तथ्ये विचारात घ्यावी लागतील आणि तुमच्या नकारात्मक विचाराच्या मूळ कारणावर हल्ला करावा लागेल आणि ते उपटून टाकावे लागेल. तुम्ही जसा विचार करता ते बदलण्यासाठी तुम्हाला लक्ष्यित आणि आक्रमक व्हावे लागेल. तुम्हाला प्रथम जुन्या हानिकारक आणि घातक विचारांच्या जागी खरे व सद्गुणी विचार आणावे लागतील. हे शोधण्यासाठी, तुम्हाला देवाच्या वचनात जावे लागेल आणि तो तुम्हाला काय म्हणतो, तो तुमच्यावर कसे प्रेम करतो आणि तो तुमच्यामध्ये आणि तुमच्याद्वारे काय करतो हे ओळखण्यास सुरुवात करावी लागेल. एकदा का तुम्ही हे जाणून घेतले, की तुम्ही सक्रियपणे जुन्याच्या जागा नवीन विचार मांडू शकता. तुम्ही तुमच्या विचारसरणीला बेजार दृष्टिकोनातून विजयी व्यक्तीच्या दृष्टिकोनात पुन्हा घडवले पाहिजे! पुन्हा घडविण्यासाठी तुम्हाला तुमचा दृष्टिकोन अशा दृष्टिकोनाकडे वळवावा लागेल जो देव, त्याचे राज्य आणि त्याचे हेतू याकडे लक्ष देऊ लागतो. मग तुम्हाला कळेल की रान फक्त तुमच्यासाठी नाही तर जे डोळ्यांनी दिसते त्यापेक्षा खूप जास्त आहे.
पवित्र शास्त्र
या योजनेविषयी

येशूचा प्रत्येक अनुयायी स्वतःला अनिवार्यपणे ज्या रानात पाहिल, तो पूर्णपणे वाईट नाही. ते देवाच्या अगदी जवळचे स्थान असू शकते आणि आमच्या जीवनात त्याच्या हेतूंची अधिक स्पष्टता. या लेखनाद्वारे तुमच्या रानातील ऋतूच्या चमत्कृतीप्रत तुमचे डोळे उघडण्याची आशा केली जाते.
More
ही योजना प्रदान केल्याबद्दल आम्ही Christine Jayakaran चे आभार मानू इच्छितो. अधिक माहितीसाठी, कृपया भेट द्या: www.instagram.com/christinejayakaran









