रानाचा चमत्कारनमुना

रानातील आश्चर्य
नेगेव वाळवंट हे जगातील सर्वात ओसाड देशांपैकी एक आहे आणि तरीही अब्राहाम आणि इसहाकाच्या काळात त्यांनी खोदलेल्या विहिरींनी भरलेले होते. विशेषतः इसहाकाने अनेक विहिरी खोदल्या ज्यामुळे त्याचे असंख्य आणि सतत वाढतेे कळप आणि गुरेढोरे टिकून राहिली. असे म्हटले जाते की त्याने त्याच वर्षी बीे पेरले आणि शंभरपट कापणी केली. जर कधी झाले असेल तर जो एक कृषी चमत्कार होता कारण ते त्या देशात तीव्र दुष्काळाच्या वेळी असे घडून आले. दुष्काळ अथवा कनानच्या शुष्क वातावरणाने त्याला खोलवर विहीरी खोदून त्याच्यासाठी, त्याच्या कुटुंबासाठी आणि त्याच्या गुरांसाठी जीवनदायक पाणी शोधून काढण्यापासून रोखले नाही.
इसहाकाच्या यशाची आणि भरघोस समृद्धीची किल्ली त्याचे प्रयत्न नव्हते तर प्रत्येक पावलावर देवाचे सान्निध्य होते. 20 व्या शतकात, आम्हाला विहीर कशी खोदावी याची कल्पना देखील नाही, आपण पुढील सर्वाेत्तम गोष्ट करू शकतो. आपल्या सर्वात ओसाड आणि कठीण हंगामाच्या वेळी आपण देवाचा शोध घेऊ शकतो. तो दूर नाही. वस्तुतः तो आपल्याला माहित आहे त्यापेक्षा जवळ आहे. विहिरीजवळ येशूला भेटलेल्या शोमरोनी स्त्रीप्रमाणे, तो आपली वाट पाहतो. तो आपल्यासोबत राहण्याची, आपले ऐकण्याची आणि आपल्याशी बोलण्याची इच्छा धरतो. समस्या ही आहे की आपले आधुनिक जीवन इतके कल्लोळााने भरलेले आहे की आपल्याला कर्णकटु गोंधळ बंद करून त्याच्याशी जुळते घेणे अशक्य वाटते. रान इतके अनुकूलित आहे की आपण अशा शांत ठिकाणी आढळतो जेथे आपल्याला फक्त आपले स्वतःचा श्वास आणि आपल्याभोवतीच्या गोंधळाचा आणि स्पष्टतेचा अभाव असलेले वारे घोंघावतांना ऐकू येतात. ही सर्वाेत्तम वेळ आहे की जीवनाचा झरा अशा येशूसोबत बसून आपण खोलवर जावे हा काळ कितीही कठीण असला तरी, या काळात देव कोण आहे याचा विस्मय शोधणे हा सर्वात मोठा आनंद ठरेल. तो पूर्वी कधी नव्हे इतके त्याचे सामर्थ्य आणि वैभव दाखवील. तो सिद्ध करील की तो सर्वाेच्च त्राता आहे ज्या प्रकारे तो जीवन आमच्या मार्गात आणत असलेल्या सर्वात वाईट परिस्थितींतून उत्तम ते बाहेर काढतो. तो अक्षरशः दुसरा कुठलाही मार्ग नसतांना अरण्यात मार्ग काढेल. तो तुमचे रक्षण करेल आणि अगदी लहानात लहान गोष्टींतही तुमची गरज पुरवील. मजेदार गोष्ट ही आहे की तो तुम्हाला, रानात चालणाऱ्या व्यक्तीपेक्षा पूर्णपणे वेगळ्या व्यक्तीत बदलून टाकील. तुम्हाला एकांतात, वादळांना तोंड देत असतानाही आणि जीवनाच्या खवळलेल्या समुद्रातही सुखदायक वाटेल. तुमच्याठायी अशी सहनशक्ती निर्माण होईल जी आतून बाहेर बळ प्रसुत करील. येशूने त्याच्या शिष्यांना अभिवचन दिलेल्या शालोम शांतीच्या भावनेने तुम्ही वाटचाल कराल. देव तुमच्यासोबत आहे या जाणीवेने उत्पन्न आत्मविश्वासाने तुमचे डोके उंच होईल आणि तुमचे अंतःकरण या देवासमोर उपासनेत झुकलेले असेल जो आपल्या हातांत विश्वासाचा भार सांभाळतो.
तुम्ही रान जे काही आहे आणि ते तुमच्यासाठी जे काही करेल त्यासाठी त्याचा स्वीकार करण्यास तयार आहात का? जो देव तुम्हाला आत घेऊन जाईल आणि अरण्यातून बाहेर काढेल त्याने तुमचा स्वीकार करावा यासाठी तुम्ही तयार आहात का? तो देव ज्याच्यासाठी काहीही अशक्य नाही!
ही बायबल योजना लेखिका क्रिस्टीन जयकरण यांनी लिहिलेल्या पुस्तकाचा भाग आहे आणि खालील लिंकवर क्लिक करून आता उपलब्ध आहे: https://www.christinejayakaran.com
या योजनेविषयी

येशूचा प्रत्येक अनुयायी स्वतःला अनिवार्यपणे ज्या रानात पाहिल, तो पूर्णपणे वाईट नाही. ते देवाच्या अगदी जवळचे स्थान असू शकते आणि आमच्या जीवनात त्याच्या हेतूंची अधिक स्पष्टता. या लेखनाद्वारे तुमच्या रानातील ऋतूच्या चमत्कृतीप्रत तुमचे डोळे उघडण्याची आशा केली जाते.
More
ही योजना प्रदान केल्याबद्दल आम्ही Christine Jayakaran चे आभार मानू इच्छितो. अधिक माहितीसाठी, कृपया भेट द्या: www.instagram.com/christinejayakaran