रानाचा चमत्कारनमुना

तुमचे चित्त भटकू देऊ नका
स्तोत्रकर्त्याने देवाला एक मजेशीर विनंती केली. तो देवाला “तुझ्या नावाचे भय धरण्यास माझे चित्त एकाग्र कर” अशी विनंती करतो. जर त्याला माहित नसते की त्याचे चित्त कधीकधी विभाजित होते आणि विस्मृतीत भटकून जाते तर त्याने असे का विचारले असते! मला खात्री आहे की तुम्ही सहमत असाल की आपल्या सर्वांच्या अंतःकरणाची सारखीच समस्या आहे. यिर्मया संदेष्ट्याने आपल्या हृदयाच्या कपटी स्वभावाच्या मूळ समस्येस संबोधित करून आपल्यासाठी परिस्थिती आणखी बिकट केली. आपण सवयीनुसार इतरांशी खोटे बोलू शकतो आणि आपले हृदय त्या असत्यावर विश्वास ठेवू लागते आणि शेवटी ते सत्य वाटू लागते. दुसरीकडे आपण कदाचित इतरांशी खोटे बोलत नसणार परंतु आपण स्वतःशी खोटे बोलतो.
रान आपल्या अंतःकरणाचा हट्टीपणा वाढवतो. आपल्या मनासारखे काहीही होत नसल्यास, फक्त आपल्या भावनांचे अनुसरण करण्याची आपल्या अंतःकरणाची प्रवृत्ती असते. भावना एक सूचक म्हणून महान आहेत परंतु त्या वाईट चालक बनतात. जर आपले जीवन आपल्या भावनांनी प्रेरित होत असेल तर देव आमची मदत करो. आपले अंतःकरण आपल्या आवडी, प्रेम, भावना आणि जाणीवांचे केंद्र आहे. जेव्हा आपल्याला वारंवार पराजय आणि संघर्षांचा सामना करावा लागतो तेव्हा आमचे अंतःकरण जुन्या लयीत आणि रूपसरणींत परत जाते. आपण ज्या गोष्टींबद्दल खंबीर आणि दृढनिश्चयी होतो त्याकडे आपण कानाडोळा करतो. आपण “काहीही चालेल” अशा वृत्तीने जगू लागतो. ख्रिस्ताचा खरा शिष्य बनू इच्छिणाऱ्या अनुयायासाठी हे खूप हानिकारक असू शकते.
आपण ज्याप्रकारे आपल्या अंतःकरणाचे भटकण्यापासून रक्षण करू शकतो, ते म्हणजे पूर्ण तत्परतेने त्याचे रक्षण करणे. याचा अर्थ असा की आपल्या वारंवार येणाऱ्या निराशेच्या दरम्यान आपण आपले प्रेम कशाकडे जात आहे याबद्दल जाणीवपूर्वक विचार करतो. यासाठी आपल्या अंतःकरणाच्या हेतूंवर, अजेंडांवर आणि प्रवृत्तींवर नियंत्रण ठेवण्यासाठी शिस्तीचे पालन करणे अगत्याचे ठरते. हे सर्व करणे महत्वाचे आहे कारण आपल्या अंतःकरणाची स्थिती आपल्या जीवनाची दिशा ठरवते. रान हा एक असा ऋतू आहे जेथे आपल्या अंतःकरणास पुन्हा सुरुवात करावी लागेल जेणेकरून ज्या गोष्टींनी देवाची जागा घेतली आहे त्या सर्व गोष्टींची जागा स्वतः देवाबद्दलच्या सखोल प्रेमाने बदलली पाहिजे. मोशेने लोकांना वारंवार सूचना दिल्याप्रमाणे, आपण “आपल्या संपूर्ण अंतःकरणाने, बुद्धीने,आज आणि आपल्या जीवनात दररोज येशूला समोरासमोर भेटेपर्यंत” देवावर आपल्या पूर्ण मनाने, पूर्ण जीवाने, आणि पूर्ण शक्तीने प्रेम करण्याची” निवड केली पाहिजे.
पवित्र शास्त्र
या योजनेविषयी

येशूचा प्रत्येक अनुयायी स्वतःला अनिवार्यपणे ज्या रानात पाहिल, तो पूर्णपणे वाईट नाही. ते देवाच्या अगदी जवळचे स्थान असू शकते आणि आमच्या जीवनात त्याच्या हेतूंची अधिक स्पष्टता. या लेखनाद्वारे तुमच्या रानातील ऋतूच्या चमत्कृतीप्रत तुमचे डोळे उघडण्याची आशा केली जाते.
More
ही योजना प्रदान केल्याबद्दल आम्ही Christine Jayakaran चे आभार मानू इच्छितो. अधिक माहितीसाठी, कृपया भेट द्या: www.instagram.com/christinejayakaran









