YouVersion लोगो
सर्च आयकॉन

रानाचा चमत्कारनमुना

रानाचा चमत्कार

6 पैकी 5 दिवस

तुमची पावले भटकू देऊ नका

रानातील वाळवंटासारख्या परिस्थितीची समस्या म्हणजे तो आराम ज्यात आपले पाय किती सहज अडखळू शकतात. डोंगरांकडे धावण्याच्या प्रयत्नात आपण रस्त्याच्या कडेला पडू शकतो. रानातून पळून जाण्याच्या प्रयत्नात आपण स्वतःला अडचणीत पडलेले पाहू शकतो. देव आम्हाला त्याच्यासोबत चालण्याचे आमंत्रण देतो जसे नोहा आणि हनोखाने केले. त्यांचे जीवन समस्यामुक्त नव्हते याची मला खात्री आहे आणि तरीही हे लोक कधीही देवाच्या पुढे धावले नाहीत. ते देवासोबत विश्वासूपणे चालले, असे पवित्रशास्त्र आम्हाला आश्वासन देते.

आपल्या आयुष्यात, आपण आपल्यासाठी असलेल्या मार्गावरून चालून जाऊ शकत नाही पण जेव्हा परिस्थिती योग्य नसते तेव्हा आपल्याला असे आढळून येऊ शकते की आपण लहानात लहान अडखळणांवरही अडखळत आहोत. जेव्हा तुम्ही एखाद्या दीर्घकालीन आजाराशी झुंजता तेव्हा तुम्हाला असे वाटू लागते की कदाचित तुम्ही देवाकडून आरोग्य प्राप्त करून घेण्यास पात्र नाही. जेव्हा तुम्ही एखाद्या प्रिय व्यक्तीला गमावता तेव्हा तुम्हाला वाटते की देवाने तुमच्यासोबत असे केले आहे का. जेव्हा तुमच्या प्रार्थनांचे उत्तर मिळत नाही तेव्हा तुम्ही प्रार्थना पूर्णपणे सोडून देण्याचा विचार करता. जेव्हा तुमची मंडळी आणि तुमचे पाळक तुमचा प्रवास समजत नाहीत तेव्हा तुम्ही ठरवता की ख्रिस्ताच्या मंडळीबाहेरील मित्र मैत्री करावयास यांच्यापेक्षा चांगले आहेत.

तुम्ही कोठे अडखळत आहात याविषयी सावध असा. ती विषारी मते ओळखा जी तुम्हाला मार्गावरून दूर नेत आहे. अशा मित्रांपासून सावध असा जे तुम्हाला सुखविलासाच्या आणि त्वरीत समाधान देण्यार्या अशा मार्गावर नेत आहेत जेथून पुढे जाण्याचा मार्ग नाही.

निःसंशयपणे, रानाचा अनुभव कठीण आहे, पण येशूने तुमच्यासाठी चिन्हांकित केलेल्या सरळ आणि अरुंद मार्गावर तुम्ही तुमचे पाय ठेवणार का ही निवड तुमची आहे. हा मार्ग सोपा होईल हे आवश्यक नाही आणि तो त्याच्या सर्व वळणांसह परिचितही वाटणार नाही. हे प्राचीन मार्ग असतील ज्यांचे परीक्षण स्वतः येशूने केले. तुम्हाला आठवत असेल की सैतानाद्वारे परीक्षा व्हावी म्हणून सैतानाने येशूला रानात नेले. परीक्षांच्या त्या 40 दिवसांत, शत्रूने त्याला जे काही करता येईल ते सर्व करण्याचा प्रयत्न करून येशूला त्याला सोपविण्यात आलेल्ल्या जगीक कामगिरीत अडखळण आणण्याचा प्रयत्न केला. येशू स्थिर राहिला आणि मार्गावर राहिला कारण त्याला माहीत होते की त्याला कोणी पाठविले आहे आणि कशासाठी पाठविण्यात आले आहे. त्याच्या मूळ हेतूपासून तो मुळीच डळमळला नाही अथवा मागे गेला नाही. त्याच्यासारखे आणखी बनणे हे आमचे ध्येय असले पाहिजे. तुमच्या निर्धाराची कसोटी होईल काय? होय, तुम्हाला मार्ग सोडून जाण्याचा मोह होईल का? होय.जर तुम्ही येशूचे जवळून अनुसरण केले तर तुमचे पाय किती स्थिर असतील हे पाहून तुम्हाला आश्चर्य वाटेल.

या योजनेविषयी

रानाचा चमत्कार

येशूचा प्रत्येक अनुयायी स्वतःला अनिवार्यपणे ज्या रानात पाहिल, तो पूर्णपणे वाईट नाही. ते देवाच्या अगदी जवळचे स्थान असू शकते आणि आमच्या जीवनात त्याच्या हेतूंची अधिक स्पष्टता. या लेखनाद्वारे तुमच्या रानातील ऋतूच्या चमत्कृतीप्रत तुमचे डोळे उघडण्याची आशा केली जाते.

More

ही योजना प्रदान केल्याबद्दल आम्ही Christine Jayakaran चे आभार मानू इच्छितो. अधिक माहितीसाठी, कृपया भेट द्या: www.instagram.com/christinejayakaran