मत्तय 20

20
द्राक्षमयामधला मजुरसना दृष्टांत
1“स्वर्गना राज्य त्या घरमालकना मायक शे; जो आपला द्राक्षमयामा रोजी मजुर लावाकरता सकायमा बाहेर निंघना.” 2अनी त्यानी रोजनी मजुरी एक चांदिना शिक्का ठराईन मजुरसले द्राक्षमयामा धाडी दिधं. 3मंग तो जवळपास नऊ वाजाले घरना बाहेर गया, तवय त्यानी काही जणसले बजारमा रिकामं उभं दखं. 4तो त्यासले बोलना, तुम्हीन बी द्राक्षमयामा जा, जी मजुरी व्हई ती मी तुमले दिसु; अनी त्या गयात. 5मंग जवळपास बारा वाजता अनं तिन वाजता तो बाहेर गया तवय पण त्यानी तसच करं. 6जवळपास पाच वाजाले तो बाहेर गया, तवय आखो कित्येक जणसले रिकाम उभं दखं. तवय त्यानी त्यासले ईचारं, तुम्हीन पुरा दिन का बर आठे रिकामा उभा राहेल शेतस? 7त्या त्याले बोलणात, आमले कोणी कामवर लाय नही म्हणीन त्यानी त्यासले सांगं, तुम्हीन बी मना द्राक्षमयामा जा. 8मंग संध्याकायले द्राक्षमयाना मालकनी त्याना कारभारीले सांगं, मजुरसले बलाई आनं अनी शेवटला मजुरसपाईन सुरवात करीसन पहिला मजुरपावत त्यासले मजुरी दे. 9तवय जवळपास संध्याकायना पाच वाजता ज्यासले कामवर लायल व्हतं त्यासले पुरा रोज एक चांदीना शिक्का भेटना. 10मंग पहिला मजुर वनात अनी आपले त्यासनापेक्षा जास्त मजुरी भेटी अस त्यासले वाटणं, पण त्यासले बी तेवढाच रोज भेटना. 11तो त्यासनी लेवानंतर त्या मालकबद्दल कुरकुर करीसन बोलणात, 12ह्या शेवटलासनी एकच तास काम करा अनी आम्हीन दिनभर ऊनतान्हमा कष्ट करात तरी तुम्हीन आमले अनी त्यासले मायकच रोज दिधा. 13तवय त्यानी मजुरसमधला एकले उत्तर दिधं, अरे दोस्त, मी तुनावर अन्याय नही करा. हाईच मजुरीमा दिनभर काम करानं, हाई आपलं ठरेल व्हतं ना. 14जे तुले भेटेल शे ते लिसन निंघी जाय; जेवढं तुले तेवढं शेवटनासले पण देवानं अशी मनी ईच्छा शे. 15जे मनं शे त्यानं मी मना मर्जीप्रमाणे करसु, मी कोणा बांधायेल शे का? मनं उदार वागनं तुना डोयामा येस का? 16#मत्तय १९:३०; मार्क १०:३१; लूक १३:३०याप्रमाणेच शेवटला त्या पहिला अनी पहिला त्या शेवटला व्हतीन.
तिसरांदाव येशुनी स्वतःना मृत्युबद्दल करेल भविष्य
(मार्क १०:३२-३४; लूक १८:३१-३४)
17यरूशलेमले जातांना येशुनी वाटमा त्याना बारा शिष्यसले एकांतमा लई जाईन सांगं, 18दखा, आपण यरूशलेमले जाई राहिनुत; मनुष्यना पोऱ्याले मुख्य याजक #२०:१८ याजक धर्मगुरूअनं शास्त्री यासना हवाले करतीन, त्या त्याले मरणदंडसाठे दोषी ठरावतीन. 19त्या त्यानी थट्टा कराले, फटका माराले अनं क्रुसखांबवर खियाले त्याले गैरयहूदीसना हवाले करतीन अनी तिन दिनमा तो परत जिवत व्हई.
एक मायनी ईनंती
(मार्क १०:३५-४५)
20तवय जब्दीना पोऱ्यासनी माय तिना पोऱ्याससंगे येशुकडे गई अनी त्याना पाया पडीसन त्याले एक ईनंती करी 21येशुनी तिले ईचारं, तुले काय पाहिजे? ती त्याले बोलनी, तुना राज्यमा मना ह्या दोन्ही पोऱ्यासमाधला एकले उजवीकडे अनी दुसराले तुना डावीकडे बसाडं, अशी मनी ईच्छा शे. 22येशुनी तिले उत्तर दिधं की, तुम्हीन काय मांगी राहीनात तुमले समजत नही. जो प्याला मी पेवाव शे तो तुमले पिता ई का त्या त्याले बोलनात, पिता ई. 23त्यानी त्यासले सांगं, मना प्याला तुम्हीन पिशात हाई खरं, पण मना उजवीकडे अनं डावीकडे बसाना अधिकार देनं मनाकडे नही शे, तर ज्यासनाकरता मना बापनी हाई जागा तयार करेल शे, हाई त्यासनाकरता शे. 24हाई गोष्ट ऐकीन दहा शिष्यसले त्या दोन्ही भाऊसना राग वना. 25#लूक २२:२५,२६येशुनी त्यासले बलाईसन सांगं, गैरयहूदीसमा अधिकारी प्रभुत्व चालाडतस अनं मोठा लोके बी अधिकार गाजाडतस हाई तुमले माहीत शे. 26#मत्तय २३:११; मार्क ९:३५; लूक २२:२६पण तुमनामा तसं व्हवाले नको; म्हणीन तुमनामा ज्याले कोणले श्रेष्ठ होणं शे, त्यानी पहिले तुमना सेवक व्हवाले पाहिजे. 27अनी तुमनामा ज्याले पहिला व्हवानी ईच्छा शे, त्यानी तुमना दास व्हवाले पाहिजे. 28यामुये मनुष्यना पोऱ्या सेवा करी लेवाले नही तर सेवा कराले अनी बराच लोकसना पापनं मोल म्हणीन आपला जीव देवाले येल शे.
दोन आंधयासले दृष्टीदान
(मार्क १०:४६-५२; लूक १८:३५-४३)
29मंग त्या यरीहो शहरतीन जाई राहींतात तवय लोकसनी मोठी गर्दी त्यासना मांगे चाली राहींती. 30तवय दखा, वाटवर बशेल दोन आंधयासनी येशु जवळतीन जाई राहीना, हाई ऐकीन, त्या वरडीसन बोलणात, “प्रभु, अहो दावीदना पोऱ्या, आमनावर दया करा.” 31तवय त्यासले लोकसनी वरडू नका अस धमकाडं, पण त्या जास्तच वरडीन बोलु लागणात, “प्रभु, अहो दावीदना पोऱ्या! आमनावर दया करा.” 32येशुनी ऊभं राहीसन त्यासले बलाईन सांगं, “मी तुमनाकरता काय करू अशी तुमनी ईच्छा शे?” 33त्या बोलणात, “प्रभुजी, आमनी ईच्छा शे की, आमना डोया उघडी जावोत.” 34तवय येशुले त्यासनी किव वनी त्यानी त्यासना डोयाले स्पर्श करा; तवय त्यासले लगेच दखावु लागनं, अनी त्या त्याना मांगे चालु लागणात.

اکنون انتخاب شده:

मत्तय 20: Aii25

های‌لایت

به اشتراک گذاشتن

کپی

None

می خواهید نکات برجسته خود را در همه دستگاه های خود ذخیره کنید؟ برای ورودثبت نام کنید یا اگر ثبت نام کرده اید وارد شوید

ویدیوهایی برای मत्तय 20