YouVersion Logo
Search Icon

नीतिसूत्रे 4

4
कोणतीही किंमत देऊन ज्ञान प्राप्त कर
1माझ्या मुलांनो, वडिलांचा बोध ऐका;
त्याकडे लक्ष द्या आणि समंजसपणा मिळवा.
2मी तुम्हाला उत्तम शिक्षण देतो,
म्हणून माझ्या शिक्षणाचा त्याग करू नका.
3कारण मी सुद्धा माझ्या वडिलांचा पुत्र होतो,
अजूनही सुकुमार आणि आईच्या प्रेमात वाढलेला.
4तेव्हा त्यांनी मला शिकविले आणि ते मला म्हणाले,
“तुझ्या संपूर्ण अंतःकरणापासून माझ्या वचनांकडे लक्ष लाव;
माझ्या आज्ञांचे पालन कर आणि तुला आयुष्य लाभेल.
5सुज्ञान मिळव, समंजसपणा प्राप्त कर;
माझी वचने विसरू नकोस किंवा त्यांच्यापासून दूर जाऊ नकोस.
6सुज्ञानाचा त्याग करू नकोस आणि ती तुझे रक्षण करेल;
तिच्यावर प्रीती कर आणि ती तुझे रक्षण करेल.
7सुज्ञानाची सुरवात अशी आहे: सुज्ञान मिळव.#4:7 किंवा सुज्ञान सर्वश्रेष्ठ आहे; म्हणून ते मिळव
जरी तुझ्याकडे जे आहे#4:7 किंवा सुज्ञान जे काही तुला मिळेल ते सर्व खर्च करावे लागले तरी समंजसपणा मिळव.
8तू जर तिला उराशी जतन करशील तर ती तुला उंचावेल.
ज्ञानाला दृढ आलिंगन दे मग ती तुला सन्मान देईल;
9ती तुझ्या मस्तकांवर फुलांचा मुकुट देईल,
आणि एक सुशोभित मुकुट तुला सादर करेल.”
10माझ्या मुला ऐक, मी काय म्हणतो ते स्वीकार,
आणि तुझ्या आयुष्याची वर्षे पुष्कळ होतील.
11मी तुला सुज्ञान मार्गाचे शिक्षण देतो,
आणि तुला सरळ वाटेने चालवितो.
12जेव्हा तू चालशील तेव्हा तुझी पावले लटपटणार नाहीत;
जेव्हा तू धावशील, तू अडखळणार नाहीस.
13बोधवचने अंमलात आण, ती सोडून देऊ नकोस;
त्यांचे चांगले रक्षण कर, कारण त्यातच तुझे जीवन आहे.
14दुष्ट लोकांच्या मार्गात पाऊल टाकू नकोस,
किंवा दुष्कृत्ये करणार्‍यांच्या मार्गाने जाऊ नकोस.
15त्याकडे पाठ फिरव, त्यावर प्रवास करू नकोस,
त्यांच्यापासून मागे वळ आणि तुझ्या मार्गाने जा,
16कारण दुष्कर्म केल्याशिवाय ते स्वस्थ राहू शकत नाहीत;
कोणाला तरी अडखळून पाडल्याशिवाय त्यांना झोप येत नाही.
17दुष्टाईने मिळविलेली भाकर ते खातात,
आणि हिंसाचाराचा द्राक्षारस ते पितात.
18नीतिमान मनुष्याचा मार्ग सकाळच्या सूर्याप्रमाणे आहे,
दुपारपर्यंत अधिकच तेजस्वी होणाऱ्या प्रकाशाप्रमाणे तो आहे.
19दुर्जनाचा मार्ग गडद अंधकाराप्रमाणे आहे;
त्यांना काय अडखळविते हे त्यांना कळत नाही.
20माझ्या मुला, मी काय म्हणतो त्याकडे लक्ष दे;
माझ्या शब्दांकडे तुझे कान लाव.
21त्यांना तुझ्या दृष्टीपासून दूर जाऊ देऊ नकोस;
त्यांना तुझ्या अंतःकरणात ठेव;
22कारण ज्यांना ते मिळतात, त्यांच्यासाठी ते जीवन आहेत.
आणि ते त्यांच्या संपूर्ण शरीराला आरोग्य देतात.
23सर्वापेक्षा अधिक तुझ्या हृदयाचे रक्षण कर,
कारण जे सर्वकाही तू करतो, ते त्यापासून निष्पन्न होते.
24सर्वप्रकारच्या विकृती तुझ्या मुखापासून दूर ठेव;
अपभ्रष्ट भाषण तुझ्या ओठांपासून दूर असू दे.
25तुझ्या डोळ्यांनी तू समोरच पाहा;
तुझी नजर एकटक सरळ बघेल असे लक्ष ठेव.
26तुझ्या पावलांसाठी असलेल्या मार्गाचा काळजीपूर्वक विचार#4:26 किंवा मार्ग सपाट करणे कर,
आणि तुझ्या सर्व मार्गामध्ये तू स्थिर राहा.
27उजवीकडे किंवा डावीकडे वळू नकोस;
वाईटाकडे जाण्यापासून तुझी पावले दूर ठेव.

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in

Videos for नीतिसूत्रे 4