YouVersion Logo
Search Icon

यहोशुआ 17

17
1योसेफाचा प्रथमपुत्र म्हणून मनश्शेहच्या गोत्राला देण्यात आलेला वाटा हा होता. गिलआदाचा पूर्वज माखीर, मनश्शेहच्या प्रथमपुत्राला गिलआद व बाशान हे मिळाले कारण माखीरी लोक महान योद्धे होते. 2हा वाटा मनश्शेहच्या बाकीच्या लोकांसाठी; अबिएजेर, हेलेक अस्रिएल, शेखेम, हेफेर व शेमीदा यांच्या कुळांसाठी होता. योसेफाचा पुत्र मनश्शेहच्या कुळातील हे इतर पुरुष वंशज आहेत.
3मनश्शेहचा पुत्र माखीर, याचा पुत्र गिलआद, याचा पुत्र हेफेर, याचा पुत्र सलाफहाद याला पुत्र नव्हते, परंतु फक्त कन्याच होत्या, त्यांची नावे महलाह, नोआह, होगलाह, मिल्काह व तिरजाह ही होती. 4त्या एलअज़ार याजक, नूनाचा पुत्र यहोशुआ आणि पुढाऱ्यांकडे गेल्या आणि म्हणाल्या, “याहवेहने मोशेला आज्ञा दिली होती की आमच्या कुटुंबामध्ये आम्हाला वतन दिले जावे.” तेव्हा यहोशुआने याहवेहच्या आज्ञेप्रमाणे त्यांच्या वडिलांच्या भावांबरोबर त्यांना वतन दिले. 5यार्देनेच्या पूर्वेकडे गिलआद व बाशान याशिवाय मनश्शेहच्या वाट्याला भूमीचे दहा भाग आले, 6कारण मनश्शेहच्या गोत्रातील कन्यांना पुत्रांमध्ये वतन मिळाले. गिलआदाचा प्रदेश मनश्शेहच्या बाकीच्या वंशजाचा झाला होता.
7मनश्शेहच्या गोत्राची सीमा आशेरापासून शेखेमाच्या पूर्वेस मिकमथाथपर्यंत जाते. तिथून ही सीमा दक्षिणेला एन-तप्पूआहच्या लोकांच्या वस्तीपर्यंत जाऊन पोहोचते. 8(मनश्शेहकडे तप्पूआहचा प्रांत होता, परंतु मनश्शेहच्या प्रदेशाच्या सीमेवरील तप्पूआह एफ्राईमकडे होते.) 9ती सीमा पुढे दक्षिणेकडील कानाहा ओढ्याकडे जाते. एफ्राईमच्या मालकीची नगरे मनश्शेहच्या नगरांमध्ये होती, परंतु मनश्शेहच्या प्रदेशाची सीमा ओढ्याच्या उत्तरेकडे होती आणि भूमध्य समुद्राकडे संपते. 10दक्षिणेकडील प्रदेश एफ्राईमच्या मालकीचा होता व उत्तरेकडे असलेली शहरे मनश्शेहची होती. मनश्शेहची सीमा भूमध्य समुद्रापर्यंत होती आणि त्याच्या उत्तरेकडे आशेर व पूर्वेकडे इस्साखार आहेत.
11इस्साखार आणि आशेरच्या प्रदेशात बेथ-शान, इब्लाम आणि दोर येथील लोक, एनदोर, तानख, आणि मगिद्दो त्यांच्या जवळच्या वसाहतीसह मनश्शेहचे होते (यादीतील तिसरे नगर नाफोथ#17:11 म्हणजे नाफोथ दोर होते).
12तरीही मनश्शेहचे वंशज त्या नगरांमध्ये राहू शकत नव्हते, कारण कनानी लोकांनी त्यात राहण्याचा अट्टाहास केला होता. 13परंतु जेव्हा इस्राएली लोक समर्थ झाले, तेव्हा त्यांनी कनानी लोकांना आपले गुलाम बनविले पण त्यांना देशातून पूर्णपणे बाहेर घालवून दिले नाही.
14योसेफाचे लोक यहोशुआला म्हणाले, “वतन म्हणून तू आम्हाला एकच वाटा आणि एकच भाग का दिला आहेस? आम्ही संख्येने पुष्कळ लोक आहोत आणि याहवेहने आम्हाला पुष्कळ आशीर्वादित केले आहे.”
15तेव्हा यहोशुआने उत्तर दिले, “जर तुम्ही संख्येने पुष्कळ आहात आणि एफ्राईमचा डोंगराळ प्रदेश तुमच्यासाठी खूप लहान आहे, तर परिज्जी व रेफाईम लोक राहतात तो रानाचा प्रदेश तुमच्यासाठी मोकळा करून घ्या.”
16योसेफाच्या लोकांनी म्हटले, “डोंगराळ प्रदेश आम्हाला पुरेसा नाही आणि बेथ-शान व सभोवतालच्या वस्तीत राहणारे व येज्रील खोर्‍यात राहणार्‍या कनानी लोकांजवळ लोखंडी रथ आहेत.”
17परंतु यहोशुआ योसेफाच्या गोत्राचे एफ्राईम आणि मनश्शेहला म्हणाला; “तुम्ही संख्येने पुष्कळ आणि बलवान आहात. तुम्हाला केवळ एकच भाग नसावा 18परंतु अरण्यातील डोंगराळ भाग व त्याच्या टोकापर्यंतच्या हद्दी तुमच्या होतील; जरी कनानी लोकांजवळ लोखंडी रथ आहेत आणि ते फार शक्तिशाली आहेत, तरीही तुम्ही त्यांना घालवून देऊ शकाल.”

Currently Selected:

यहोशुआ 17: MRCV

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in