YouVersion Logo
Search Icon

प्रकटीकरण वळख

वळख
प्रकटीकरण हाई पुस्तक नवं करारमधलं शेवटलं पुस्तक शे. तसच हाई शेवट लिखामं वनं प्रेषित योहाननी येशु ख्रिस्तना जन्मानानंतर इसवी. ९५ ना जोडेजोडे ते लिखामा वनं. योहान १:१ अनी त्यानीच योहानकृत शुभवर्तमान अनी योहाननी पहिलं, दुसरं अनी तीसरं पत्र लिखं. हाऊच योहानाले लोकं “ज्यानावर येशुनी प्रिती व्हती” अस म्हणीसन वळखी राहिंतात. योहान १३:२३ येशु ख्रिस्तना सुवार्तामुये पात्म नावना बेटवर जवय शिक्षा भोगी राहिंता त्या येळले त्यानी हाई पुस्तक लिखं. प्रकटीकरण १:९
हाई पुस्तक लिखाणामांगे योहानना हाऊ उद्देश व्हता की, मना वाचनारासले येशुनासंगे ईश्वासु रावाकरता प्रोत्साहन देवाणं अनी येशुना परत येवानं जोडे ऱ्हावामुये त्यासनामा आशा निर्माण करानी योहान १:३;२२:७ त्यानी सर्वा ईश्वासनारासले हाई पत्र लिखं पन विशेष करीसन त्या सात मंडळीसले लिखं ज्यासना उल्लेख अध्याय २–३ मा दखास. योहान स्वतःना लिखाणले देवना जोडेतीन येल संदेश, भविष्यवाणी म्हणीसन सांगस अनी ज्या गोष्टी त्यानी स्वतः दख्यात त्या गोष्टीसन वर्णन तो अलंकारी भाषामा मांडस. हाई जे पुस्तक शे हाई जुना करारमातीन काही शास्त्रभागसले मिळतं जुळतं शे, विशेष करीसन. जखर्या ६:१-८ हाई वचनासंगे त्यानं साम्य शे, तसच सात तुताऱ्या अनी सात वाट्या ह्या देवनी मिसर देशमा आणेल पिढा यानासारख्या शेतस, निर्गम ७–९ प्रकटीकरण हाई शेवटना दिनना वर्णन करस. शेवटमा येशु विजयी कशा व्हई अनी त्यानावर ईश्वास ठेवनारा त्यानासोबत सर्वाकाळ कशा जिवत राहतीन अस ते सांगस. हाई पुस्तकनाद्वारा तुमले ताकिद मिळो अनी येशुना परत येवाविषयी तुमले आशा मिळो.
रूपरेषा
१. योहान सुरवातले स्वतःनी वळख करीसन त्याले भविष्यवाणी कशी प्राप्त व्हयनी हाई सांगीसन तो सुरवात करस. प्रकटीकरण १:१-२०
२. येशुपाईन सात मंडळीसले प्रत्यक्ष मिळेल संदेश योहान देस. प्रकटीकरण २:१–३:२२
३. नंतर तो सात शिक्कासना उल्लेख करस. प्रकटीकरण ४:१–८:५ अनी सात तुतारीसना वर्णन करस. प्रकटीकरण ८:६–११:१९
४. यानानंतर योहान एक धाकला पोऱ्या सात डोकासना श्वापदनासंगे कसं लढाई करस हाई सांगस. प्रकटीकरण १२:१–१४:२०
५. यानानंतर योहान सात क्रोधना वाट्यासबद्दल लिखस प्रकटीकरण १५:१–१६:१८
६. यानानंतर देव त्याना आकाशमाधला शत्रुवर कश विजय मियाडस हाई सांगस. प्रकटीकरण १७:१–२०:१५
७. जो नवा स्वर्ग अनी जी नवी पृथ्वी शेवट ई तिनं वर्णन करस प्रकटीकरण २१:१–२२:२१

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in