मत्तय 7:16-20
मत्तय 7:16-20 MACLBSI
त्यांच्या फळांवरून तुम्ही त्यांना ओळखाल. काटेरी झाडांवरून द्राक्षे किंवा रिंगणीच्या झाडांवरून अंजीर काढतात काय? त्याचप्रमाणे प्रत्येक चांगल्या झाडाला चांगले फळ येते आणि वाईट झाडाला वाईट फळ येते. चांगल्या झाडाला वाईट फळे येणे शक्य नाही आणि वाईट झाडाला चांगली फळे येणे शक्य नाही. चांगले फऴ न देणारे प्रत्येक झाड तोडून अग्नीत टाकण्यात येते. अर्थात, त्यांच्या फळांवरून तुम्ही त्यांना ओळखाल.