YouVersion Logo
Search Icon

जखर्‍या 6

6
चार रथ
1पुन्हा मी आपले डोळे वर केले तेव्हा पाहा, दोन पर्वतांमधून चार रथ येत आहेत असे दिसले; ते पर्वत पितळेचे होते.
2पहिल्या रथाला तांबडे घोडे होते; दुसर्‍या रथाला काळे घोडे होते;
3तिसर्‍या रथाला पांढरे घोडे होते व चौथ्या रथाला कबरे लालसर घोडे होते.
4तेव्हा माझ्याबरोबर भाषण करणार्‍या दिव्यदूताला मी विचारले, “माझ्या स्वामी, हे काय आहेत?”
5दिव्यदूताने मला उत्तर केले, “हे आकाशातले चार वारे1 आहेत; ते अखिल पृथ्वीच्या प्रभूच्या हुजुरास असून आता बाहेर निघत आहेत.
6काळे घोडे असलेला रथ उत्तर देशाकडे जात आहे; पांढरे घोडे त्यांच्या मागून (पश्‍चिम देशाकडे) जात आहेत; कबरे घोडे दक्षिण देशाकडे जात आहेत.”
7तांबडे घोडेही बाहेर गेले; त्यांचा पृथ्वीभर फिरण्याचा रोख होता; त्यांना तो म्हणाला, “चला, पृथ्वीवर फिरा.” तेव्हा ते पृथ्वीवर फिरले.
8मग त्याने मला हाक मारून म्हटले, “पाहा, उत्तर देशाकडे जाणार्‍यांनी उत्तर देशात माझा आत्मा शांत केला आहे.”
यहोशवाला प्रतीकात्मक मुकुट
9मग परमेश्वराचे वचन मला प्राप्त झाले की,
10“बंदिवासातून आलेल्या लोकांपैकी हेल्दय, तोबीया व यदया ह्यांच्या माणसांना बरोबर घे; ते बाबेलहून येऊन सफन्याचा पुत्र योशीया ह्याच्या घरी उतरले आहेत, तेथे आजच्या आज जा.
11सोनेरुपे घेऊन मुकुट घडव व तो यहोसादाकाचा पुत्र यहोशवा मुख्य याजक ह्याच्या मस्तकी घाल.
12त्याला सांग की, ‘सेनाधीश परमेश्वर म्हणतो, पाहा, एक पुरुष, ज्याचे नाव कोंब असे आहे तो आपल्या स्थानी उगवेल व तो परमेश्वराचे मंदिर बांधील.
13तोच परमेश्वराचे मंदिर बांधील; तो वैभवशाली होईल; तो आपल्या सिंहासनावर बसून सत्ता चालवील; तो आपल्या सिंहासनावर याजकही होईल; ह्या दोहोंत शांततेची सल्लामसलत होईल.”’
14तो मुकुट हेलेम,2 तोबीया, यदया व सफन्याचा पुत्र हेन ह्यांचे परमेश्वराच्या मंदिरात स्मारक होईल.
15“मग जे दूर आहेत ते येतील व परमेश्वराचे मंदिर बांधण्यास हातभार लावतील आणि सेनाधीश परमेश्वराने मला तुमच्याकडे पाठवले आहे हे तुम्हांला कळून येईल. परमेश्वर तुमचा देव ह्याचे तुम्ही लक्ष देऊन ऐकाल तर हे घडून येईल.”

Highlight

Copy

Compare

Share

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in

Videos for जखर्‍या 6