YouVersion Logo
Search Icon

स्तोत्रसंहिता 8

8
देवाचा गौरव आणि मानवाची थोरवी
मुख्य गवयासाठी; गित्ती चालीवर गायचे दाविदाचे स्तोत्र.
1हे परमेश्वरा, आमच्या प्रभो, सर्व पृथ्वीवर तुझे नाव किती थोर आहे! तू आपले वैभव आकाशभर पसरले आहेस.
2तू बाळके व तान्हुली ह्यांच्या मुखाने सामर्थ्य स्थापित केले आहे; तुला विरोधी आहेत म्हणून आणि वैरी व सूड घेणारा ह्यांना कुंठित करावे म्हणून तू असे केले आहेस.
3आकाश जे तुझे अंगुलीकार्य, व त्यात तू नेमलेले चंद्र व तारे ह्यांच्याकडे पाहावे तर ―
4मर्त्य मनुष्य तो काय की तू त्याची आठवण करावी? मानव तो काय की तू त्याला दर्शन द्यावे?
5तू त्याला देवापेक्षा1 किंचित कमी असे केले आहेस; त्याला गौरव व थोरवी ह्यांनी मुकुटमंडित केले आहेस.
6तू त्याला आपल्या हातच्या कृत्यांवरचे प्रभुत्व दिले आहेस, तू सर्वकाही त्याच्या पायांखाली ठेवले आहेस.
7शेरडेमेंढरे, गुरेढोरे ही सारी, तसेच वनपशू;
8आकाशातील पाखरे, समुद्रातील मासे व जलात संचार करणारे सर्व प्राणी.
9हे परमेश्वरा, आमच्या प्रभो, सर्व पृथ्वीवर तुझे नाव किती थोर आहे!

Highlight

Copy

Compare

Share

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in