YouVersion Logo
Search Icon

स्तोत्रसंहिता 28

28
साहाय्याची याचना व ते मिळाल्याबद्दल उपकारस्तुती
दाविदाचे स्तोत्र.
1हे परमेश्वरा, मी तुझा धावा करतो; माझ्या दुर्गा, माझे न ऐकलेसे करू नकोस; तू माझ्याशी मौन धरल्यास गर्तेत पडणार्‍यांसारखी माझी गती होईल.
2मी तुझा धावा करतो, तुझ्या पवित्र गाभार्‍याकडे हात वर करतो; तेव्हा माझी दीन वाणी ऐक.
3मनात कपट असून आपल्या शेजार्‍यांशी स्नेहभावाने बोलणारे असे दुर्जन व दुष्कर्मी ह्यांच्याबरोबर मला ओढून नेऊ नकोस.
4त्यांच्या करणीप्रमाणे, त्यांच्या दुष्कृत्यांच्या मानाने त्यांच्या हातांच्या कृतीप्रमाणे, त्यांचे पारिपत्य कर; त्यांचे प्रतिफळ त्यांना दे.
5परमेश्वराची कृत्ये, त्याच्या हातची कृती, ते ध्यानात आणीत नाहीत म्हणून तो त्यांना जमीनदोस्त करील, उभारणार नाही.
6परमेश्वर धन्यवादित असो, कारण त्याने माझी दीन वाणी ऐकली आहे.
7परमेश्वर माझे सामर्थ्य व माझी ढाल आहे; त्याच्यावर मी अंतःकरणपूर्वक भाव ठेवला आणि मी साहाय्य पावलो; म्हणून माझे हृदय उल्लासते; मी गीत गाऊन त्याचे स्तवन करीन.
8परमेश्वर आपल्या लोकांचे सामर्थ्य आहे, तोच आपल्या अभिषिक्ताचा तारणदुर्ग आहे.
9तू आपल्या लोकांना तार, आपल्या वतनाला आशीर्वाद दे; त्यांचा प्रतिपाळ कर, त्यांना सदोदित वाहून ने.

Highlight

Copy

Compare

Share

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in

Videos for स्तोत्रसंहिता 28