YouVersion Logo
Search Icon

स्तोत्रसंहिता 150

150
परमेश्वराचे स्तवन करा
1परमेशाचे स्तवन करा!1 देवाचे त्याच्या पवित्रस्थानी स्तवन करा; त्याच्या सामर्थ्याच्या अंतराळात त्याचे स्तवन करा.
2त्याच्या पराक्रमाच्या कृत्यांबद्दल त्याचे स्तवन करा; त्याच्या थोरवीच्या वैपुल्यानुसार त्याचे स्तवन करा.
3कर्णा वाजवून त्याचे स्तवन करा. सतार व वीणा वाजवून त्याचे स्तवन करा.
4डफ वाजवून व नृत्य करून त्याचे स्तवन करा. तंतुवाद्ये व बासरी वाजवून त्याचे स्तवन करा.
5खणखणणारे टाळ वाजवून त्याचे स्तवन करा. झणझणणार्‍या झांजा वाजवून त्याचे स्तवन करा.
6प्रत्येक प्राणी परमेशाचे स्तवन करो. परमेशाचे स्तवन करा!1

Highlight

Copy

Compare

Share

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in

Videos for स्तोत्रसंहिता 150