YouVersion Logo
Search Icon

स्तोत्रसंहिता 110

110
देव राजाला राज्य देतो
दाविदाचे स्तोत्र.
1माझ्या प्रभूला परमेश्वर म्हणतो, “मी तुझे वैरी तुझे पदासन करीपर्यंत तू माझ्या उजवीकडे बस.”
2परमेश्वर तुझे बलवेत्र सीयोनेतून पुढे नेईल; तो म्हणतो, “तू आपल्या शत्रूंवर प्रभुत्व कर.”
3तुझ्या पराक्रमाच्या दिवशी तुझे लोक संतोषाने पुढे होतात, पावित्र्याने मंडित झालेले तुझे तरुण तुला पहाटेच्या दहिवरासारखे आहेत.
4परमेश्वराने शपथ वाहिली आहे आणि ती तो बदलणार नाही; ती अशी की, “मलकीसदेकाच्या संप्रदायाप्रमाणे तू युगानुयुग याजक आहेस.”
5तुझ्या उजव्या हाताकडे असलेला प्रभू आपल्या क्रोधाच्या दिवशी राजांचा बिमोड करील;
6तो राष्ट्रांमध्ये न्यायनिवाडा करील; रणभूमी प्रेतांनी भरील; चोहोकडे मस्तके फोडील.
7मार्गाने चालत असता तो ओहोळातले पाणी पिईल; आणि आपले डोके वर करील.

Highlight

Copy

Compare

Share

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in