YouVersion Logo
Search Icon

नीतिसूत्रे 9

9
ज्ञान आणि अज्ञान ह्यांच्या घोषणा
1ज्ञानाने आपले घर बांधले आहे; त्याने आपले सात खांब तयार केले आहेत.
2त्याने आपले पशू कापले आहेत; त्याने आपला द्राक्षारस मिसळला आहे, आपले मेजही वाढून तयार केले आहे.
3त्याने आपल्या दासी पाठवल्या आहेत, ते नगराच्या उच्च स्थानांवरून ओरडून म्हणते,
4“जो कोणी भोळा आहे तो इकडे वळो;” जो बुद्धिहीन आहे त्याला ते म्हणते,
5“ये, माझी भाकर खा; आणि मी मिसळलेला द्राक्षारस पी.
6भोळ्यांनो, तुम्ही आपले भोळेपण सोडा व वाचा; आणि सुज्ञतेच्या मार्गाने चाला.”
7जो निंदकाला वाग्दंड करतो तो आपली अप्रतिष्ठा करून घेतो; जो दुर्जनाला बोल लावतो, तो आपणाला कलंक लावून घेतो.
8निंदकाला बोल लावू नकोस, लावशील तर तो तुझा द्वेष करील; ज्ञान्याला बोल लाव म्हणजे तू त्याला अधिक प्रिय होशील.
9ज्ञान्याला बोध केला तर तो अधिक ज्ञानी होईल; नीतिमानाला बोध केला तर त्याचे ज्ञान वाढेल.
10परमेश्वराचे भय ज्ञानाचा आरंभ होय; आणि परमपवित्राला ओळखणे हीच सुज्ञता होय.
11कारण माझ्यामुळे तुझे दिवस बहुगुणित होतील, तुझ्या आयुष्याची वर्षे अधिक होतील.
12तू ज्ञानी असलास तर ते तुझे तुला; तू निंदा केलीस तर त्याचे फळ तूच भोगशील.
13मूर्ख स्त्री गडबड करणारी असते; ती भोळेपणाची केवळ मूर्ती असून तिला काही कळत नाही.
14ती नगराच्या उच्च स्थानी आपल्या घराच्या दाराजवळ आसनावर बसून राहते;
15आणि कोणी आपल्या वाटेने नीट जाणारा तिच्याजवळून जाऊ लागला म्हणजे
16ती म्हणते, “जो कोणी भोळा आहे तो इकडे वळो;” जो कोणी बुद्धिहीन असतो त्याला ती म्हणते,
17“चोरलेले पाणी गोड लागते; चोरून खाल्लेली भाकर रुचकर लागते;”
18पण तेथे मेलेले आहेत, तिचे आमंत्रित अधोलोकाच्या खोल स्थानी आहेत, हे त्याला समजत नाही. सात्त्विक आणि दुष्ट ह्यांची तुलना शलमोनाची नीतिसूत्रे.

Highlight

Copy

Compare

Share

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in