गणना 17
17
अहरोनाची काठी
(निर्ग. 7:8-13)
1परमेश्वर मोशेला म्हणाला, 2“इस्राएल लोकांशी बोल आणि त्यांच्या पूर्वजांच्या घराण्याप्रमाणे त्यांच्या सर्व सरदारांकडून प्रत्येकी एक अशा बारा काठ्या घे आणि प्रत्येक काठीवर त्याचे-त्याचे नाव लिही;
3लेवीच्या काठीवर अहरोनाचे नाव लिही; कारण इस्राएलांच्या पूर्वजांच्या घराण्यातील प्रत्येक सरदाराची एकेक काठी घे, 4आणि दर्शनमंडपातील साक्षपटासमोर जेथे मी तुम्हांला दर्शन देत असतो तेथे त्या काठ्या ठेव.
5ज्या पुरुषाला मी निवडीन त्याच्या काठीला अंकुर फुटतील; इस्राएल लोक तुमच्याविरुद्ध कुरकुर करीत आहेत ते त्यांचे कुरकुरणे मी अशा रीतीने बंद करीन.”
6मोशेने इस्राएल लोकांना ही गोष्ट सांगितली व त्यांच्या सर्व सरदारांनी आपापल्या पूर्वजांच्या घराण्याप्रमाणे प्रत्येकी एक काठी अशा एकंदर बारा काठ्या दिल्या; त्यांच्या काठ्यांमध्ये अहरोनाचीही काठी होती.
7मोशेने ह्या काठ्या साक्षपटाच्या तंबूत परमेश्वरासमोर ठेवल्या.
8दुसर्या दिवशी मोशे साक्षपटाच्या तंबूत गेला आणि पाहतो तर लेवी घराण्यातील अहरोनाच्या काठीला अंकुर फुटून ती फुलली आहे. तिला बदाम येऊन ते पिकले आहेत, असे त्याला दिसले.
9तेव्हा मोशेने त्या सर्व काठ्या परमेश्वरासमोरून काढून इस्राएल लोकांकडे नेल्या; व प्रत्येकाने आपापली काठी पाहून ती काढून घेतली.
10मग परमेश्वर मोशेला म्हणाला, “अहरोनाची काठी साक्षपटासमोर परत ठेवून दे; ह्या बंडखोरांना ती चिन्ह म्हणून ठेवावी; अशाने ते माझ्याविरुद्ध जी कुरकुर करीत आहेत ती तू बंद करशील, म्हणजे ते मरायचे नाहीत.”
11मोशेने तसे केले; परमेश्वराने त्याला आज्ञा केली होती तसे त्याने केले;
12मग इस्राएल लोक मोशेला म्हणाले, “आम्ही मरत आहोत, आमचा नाश होत आहे, आम्ही सर्वच नष्ट होत आहोत.
13जो कोणी जवळ जाईल म्हणजे परमेश्वराच्या निवासमंडपाजवळ जाईल तो मरेल. आम्हा सर्वांचा अंत होणार की काय?”
Currently Selected:
गणना 17: MARVBSI
Highlight
Copy
Compare
Share
Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in
Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र
Copyright © 2015 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.