YouVersion Logo
Search Icon

यहोशवा 16

16
एफ्राईम आणि मनश्शे ह्यांना मिळालेला प्रदेश
1योसेफाच्या वंशजांना चिठ्ठ्या टाकून मिळालेला वाटा हा : त्याची सीमा यरीहोजवळ यार्देनेपासून सुरू होते व रानातून यरीहोच्या पूर्वेकडील पाणवठ्यावरून जाते आणि यरीहोपासून डोंगराळ प्रदेशातून बेथेलास जाते.
2मग ती बेथेलापासून लूज येथे जाते व अर्की लोकांच्या सीमेवरून अटारोथ येथे निघते;
3पश्‍चिमेकडे यफलेटी लोकांच्या सरहद्दीवरून खालचे बेथ-होरोन व गेजेर येथवर जाऊन समुद्रकिनार्‍यास मिळते.
4येणेप्रमाणे योसेफाचे मुलगे मनश्शे व एफ्राईम ह्यांनी आपले वतन घेतले.
5एफ्राईम वंशजांची सरहद्द त्यांच्या-त्यांच्या कुळांप्रमाणे ही ठरली : त्यांच्या वतनाची सरहद्द पूर्वेपासून सुरू होऊन अटारोथ-अद्दार येथून वरल्या बेथ-होरोनास जाते.
6पुढे ती पश्‍चिमेकडे वळते व उत्तरेकडील मिखमथाथ येथून पूर्वेस वळते आणि तानथ-शिलो येथे जाते; तेथून पुढे ती पूर्वेकडे यानोहास जाते.
7यानोहा येथून ती अटारोथ व नारा येथे उतरून यरीहोपाशी यार्देनेवर निघते.
8ही सीमा तप्पूहा येथून निघून पश्‍चिम दिशेस जाऊन काना ओहळावरून समुद्राजवळ निघते; एफ्राइमाच्या वंशजांचे त्यांच्या कुळांप्रमाणे वतन हे होय;
9त्याखेरीज मनश्शेच्या वंशजांच्या वतनापैकी काही नगरे आसपासच्या खेड्यापाड्यांसह एफ्राइमाच्या वंशजांसाठी वेगळी करून ठेवण्यात आली.
10गेजेरात जे कनानी लोक राहत होते त्यांना एफ्राइम्यांनी घालवून दिले नाही म्हणून ते कनानी त्यांच्यामध्ये आजपर्यंत वस्ती करून आहेत; ते गुलाम होऊन वेठबिगार करणारे झाले.

Highlight

Copy

Compare

Share

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in