YouVersion Logo
Search Icon

होशेय 14

14
परमेश्वराकडे वळण्यासाठी इस्राएलाला विनवणी
1हे इस्राएला, परमेश्वर तुझा देव ह्याच्याकडे वळ, कारण तू आपल्या अधर्मामुळे ठोकर खाऊन पडला आहेस.
2तुम्ही शब्दांनिशी परमेश्वराकडे वळा; त्याला म्हणा, आमचा सर्व अधर्म दूर कर; कृपेने आमचा स्वीकार कर, म्हणजे आम्ही आमच्या वाणीचे फळ अर्पू.
3अश्शूर आमचा बचाव करणार नाही, आम्ही घोड्यावर स्वार होणार नाही, आमच्या हातच्या कृतीस, ‘आमच्या देवा,’ असे ह्यापुढे आम्ही म्हणणार नाही, कारण तुझ्याजवळ पोरक्यांना दया मिळते.
4मी त्यांना वाटेवर आणीन, त्यांच्यावर मोकळ्या मनाने प्रीती करीन, कारण त्यांच्यावरचा माझा राग गेला आहे.
5मी इस्राएलास दहिवरासारखा होईन; तो भूकमलाप्रमाणे फुलेल, लबानोनाप्रमाणे मूळ धरील.
6त्याच्या फांद्या पसरतील, त्याचे सौंदर्य जैतून वृक्षासारखे होईल, त्याला लबानोनासारखा सुवास सुटेल.
7ते परत येऊन त्याच्या छायेत राहतील; ते धान्यासारखे पुनर्जीवित होतील व द्राक्षीप्रमाणे फळ देतील; त्यांची कीर्ती लबानोनाच्या द्राक्षारसासाखी होईल.
8एफ्राइमाला ह्यापुढे मूर्तींशी काय कर्तव्य आहे? मी तर त्याचे ऐकून त्याच्यावर लक्ष ठेवीन; मी हिरव्यागार सरूसारखा आहे; माझ्यापासून तुला फळ मिळते.
9जो कोणी शहाणा आहे त्याला हे समजेल, जो कोणी समंजस आहे त्याला हे कळेल; परमेश्वराचे मार्ग सरळ आहेत; त्यांनी नीतिमान चालतील आणि पातकी त्यांत अडखळून पडतील.

Currently Selected:

होशेय 14: MARVBSI

Highlight

Copy

Compare

Share

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in