YouVersion Logo
Search Icon

होशेय 12

12
1एफ्राईम वायूची जोपासना करतो, पूर्वेच्या वार्‍याच्या मागे लागतो; दिवसभर तो लबाडी व नाश ह्यांची वृद्धी करतो; ते अश्शूराबरोबर करार करतात, मिसर देशात तेल नेतात.
2परमेश्वराचा यहूदाबरोबर वाद आहे, तो याकोबाला त्याच्या आचरणाप्रमाणे शासन करील; त्याच्या कर्माप्रमाणे तो त्याला प्रतिफळ देईल.
3गर्भाशयात असता त्याने आपल्या भावाची टाच धरली; तो आपल्या भरज्वानीत असता देवाबरोबर झगडला.
4म्हणजे अर्थात दिव्यदूताबरोबर झगडून तो जय पावला, त्याने रडून देवाची करुणा भाकली. त्याला देवाचे बेथेलास दर्शन झाले, तेथे तो आमच्याबरोबर बोलला म
5परमेश्वर, सेनाधीश देव परमेश्वर, हे नाम त्याचे स्मारक आहे :
6“म्हणून तू आपल्या देवाकडे वळ; दया व न्याय ह्यांचे पालन कर; आपल्या देवाची प्रतीक्षा करून राहा.”
7कनानाच्या1 हाती खोटा ताजवा आहे; जुलूम करणे त्याला आवडते.
8एफ्राईम म्हणतो, “मी खरोखर धनवान झालो आहे, मी संपत्ती मिळवली आहे, पापाचा बट्टा लागेल असा अधर्म माझ्या सर्व कमाईत माझ्या हातून झाला नाही.”
9मिसर देशापासून मी परमेश्वर तुझा देव आहे, उत्सवाच्या दिवसांप्रमाणे मी तुला पुन्हा तंबूत राहायला लावीन.
10मी संदेष्ट्यांबरोबर बोललो आहे; मीच दिव्यदर्शनांची रेलचेल केली आहे आणि संदेष्ट्यांच्या द्वारे मी दृष्टान्त देऊन बोध केला आहे.
11गिलाद मूर्तिपूजक बनला आहे ना? तर तो शून्यवत होऊन जाईल; गिल्गालात त्यांनी बैल अर्पण केले; त्यांच्या वेद्या शेतांच्या तासांतील दगडांच्या राशींसारख्या आहेत.
12याकोब अरामाच्या रानात पळून गेला; इस्राएलाने बायकोसाठी चाकरी केली, बायकोसाठी मेंढरे राखली.
13एका संदेष्ट्याच्या हस्ते परमेश्वराने इस्राएलास मिसर देशातून बाहेर आणले, दुसर्‍या संदेष्ट्याच्या हस्ते त्याचे रक्षण करवले.
14एफ्राइमाने क्रोध अत्यंत चेतवला आहे, त्याचा रक्तपातदोष त्याच्यावर तसाच राहील, आणि प्रभू त्याने केलेल्या अप्रतिष्ठेचे उसने फेडील.

Currently Selected:

होशेय 12: MARVBSI

Highlight

Copy

Compare

Share

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in