YouVersion Logo
Search Icon

इब्री 13

13
व्यवहारोपयोगी बोध
1बंधुप्रेम टिकून राहो.
2अतिथिप्रेमाचा विसर पडू देऊ नका; कारण
तेणेकरून कित्येकांनी देवदूतांचे आतिथ्य नकळत केले आहे.
3बंधनात पडलेल्यांबरोबर तुम्ही बंधनात आहात असे समजून त्यांची आठवण करा; आपणही देहात आहोत म्हणून पीडितांची आठवण ठेवा.
4लग्न सर्वस्वी आदरणीय असावे व अंथरूण निर्दोष असावे; जारकर्मी व व्यभिचारी ह्यांचा न्याय देव करील.
5तुमची वागणूक द्रव्यलोभावाचून असावी; जवळ आहे तेवढ्यात तुम्ही तृप्त असावे; कारण त्याने स्वतः म्हटले आहे, “मी तुला सोडून जाणार नाही व तुला टाकणार नाही.”
6म्हणून आपण धैर्याने म्हणतो2
“प्रभू मला साहाय्य करणारा आहे,
मी भिणार नाही; मनुष्य माझे काय करणार?”
पुढार्‍यांची निष्ठा
7जे तुमचे अधिकारी होते, ज्यांनी तुम्हांला देवाचे वचन सांगितले, त्यांची आठवण करा; त्यांच्या वर्तणुकीचा परिणाम लक्षात आणून त्यांच्या विश्वासाचे अनुकरण करा.
8येशू ख्रिस्त काल, आज व युगानुयुग सारखाच आहे.
9विविध आणि विचित्र शिक्षणाने बहकून जाऊ नका; कारण ज्यांकडून आचरणार्‍यांना लाभ नाही अशा खाद्यपदार्थांनी नव्हे, तर कृपेने अंतःकरण स्थिर केलेले असणे चांगले.
10आपल्याला अशी वेदी आहे की जिच्यावरचे खाण्याचा अधिकार मंडपाची सेवा करणार्‍यांना नाही.
11कारण ज्या पशूंचे ‘रक्त पापाबद्दल’ प्रमुख याजकाच्या द्वारे ‘परमपवित्रस्थानात नेले जाते’ त्यांची शरीरे ‘तळाबाहेर जाळण्यात येतात.’
12म्हणून येशूनेही स्वरक्ताने लोकांना पवित्र करावे म्हणून वेशीबाहेर मरण सोसले.
13तर आता आपण त्याचा अपमान सोसत तळाबाहेर त्यांच्याकडे जाऊ या.
14कारण आपल्याला येथे स्थायिक नगर नाही; तर जे नगर पुढे येणार आहे त्याची आपण वाट पाहत आहोत.
15म्हणून त्याचे नाव पत्करणार्‍या ‘ओठांचे फळ’ असा ‘स्तुतीचा यज्ञ’ आपण त्याच्या द्वारे ‘देवाला नित्य अर्पण करावा.’
16चांगले करण्यास व दान करण्यास विसरू नका; कारण अशा यज्ञांनी देव संतुष्ट होतो.
17आपल्या अधिकार्‍यांच्या आज्ञेत राहा व त्यांच्या अधीन असा; कारण आपणांस हिशेब द्यायचा आहे हे समजून ते तुमच्या जिवांची राखण करतात; ते त्यांना आनंदाने करता यावे, कण्हत नव्हे; तसे झाल्यास ते तुमच्या हिताचे होणार नाही.
शेवटचा संदेश
18आमच्यासाठी प्रार्थना करत राहा; सर्व बाबतींत चांगले वागण्याची आमची इच्छा असून आमचा विवेकभाव चांगला आहे अशी आमची खातरी आहे.
19आणि तुमच्याकडे माझे परत येणे अधिक लवकर व्हावे म्हणून तुम्ही प्रार्थना करा अशी माझी विशेष विनंती आहे.
20आता ज्या शांतीच्या देवाने ‘सर्वकाळच्या कराराच्या रक्ताने मेंढरांचा’ महान ‘मेंढपाळ’ आपला प्रभू येशू, ह्याला मेलेल्यांतून ‘परत आणले,’
21तो देव आपल्या दृष्टीने जे आवडते ते आपणांमध्ये येशू ख्रिस्ताच्या द्वारे करो व तो आपल्या इच्छेप्रमाणे करण्यास तुम्हांला प्रत्येक चांगल्या कामात सिद्ध करो; त्या येशू ख्रिस्ताला युगानुयुग गौरव असो. आमेन.
22बंधूंनो, मी तुम्हांला विनंती करतो की, हे बोधवचन ऐकून घ्या; कारण मी तुम्हांला थोडक्यात लिहिले आहे.
23आपला बंधू तीमथ्य ह्याची सुटका झाली आहे हे तुम्हांला कळावे; तो लवकर आला तर त्याच्याबरोबर मी तुमच्या भेटीस येईन.
24तुम्ही आपल्या सर्व अधिकार्‍यांना व सर्व पवित्र जनांना सलाम सांगा. इटलीचे बंधू तुम्हांला सलाम सांगतात.
25तुम्हा सर्वांबरोबर कृपा असो.

Currently Selected:

इब्री 13: MARVBSI

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in

YouVersion uses cookies to personalize your experience. By using our website, you accept our use of cookies as described in our Privacy Policy