YouVersion Logo
Search Icon

उपदेशक 12

12
1आपल्या तारुण्याच्या दिवसांत आपल्या निर्माणकर्त्याला स्मर; पाहा, अनिष्ट दिवस येत आहेत, आणि अशी वर्षे जवळ येत आहेत की, त्यांत “मला काही सुख नाही” असे तू म्हणशील.
2त्या समयी सूर्य व प्रकाश, चंद्र व तारे अंधुक होतील; आणि पावसानंतर अभ्रे पुन्हा येतील.
3त्या काळी घराचे रखवालदार कापतील; बळकट पुरुष वाकतील; दळणार्‍या थोड्या उरल्यामुळे त्यांचे काम बंद पडेल. खिडक्यांतून पाहणार्‍या अंध होतील.
4जात्याचा आवाज मंद झाला म्हणजे बाहेरली दारे मिटतील; पक्ष्याच्या शब्दानेदेखील त्याच्या निद्रेचा भंग होईल; सर्व गायनस्वर2 मंदावतील.
5ते चढावाला भितील; रस्ता धोक्यांनी भरला आहे असे त्यांना वाटेल; बदाम फुलेल; टोळसुद्धा जड असा वाटेल; वासना निमेल; कारण मनुष्य आपल्या अनंतकालिक निजधामास चालला आहे, आणि ऊर बडवून रडणारे गल्ल्यागल्ल्यांतून फिरतील.
6मग चांदीचा दोर तुटेल; सोन्याचा कटोरा फुटेल; झर्‍याजवळ घडा फुटेल; आडावरचा रहाट मोडेल.
7तेव्हा माती पूर्ववत मातीस मिळेल; आणि देवाने दिलेला आत्मा त्याच्याकडे परत जाईल.
8व्यर्थ हो व्यर्थ! उपदेशक3 म्हणतो, सर्वकाही व्यर्थ!
मानवाचे कर्तव्य
9उपदेशक ज्ञानी असून तो लोकांना ज्ञान शिकवत गेला; त्याने विचार व शोध करून पुष्कळ बोधवचने रचली.
10सरळ लिहिलेली सत्य व मनोहर वचने शोधण्याचा उपदेशकाने प्रयत्न केला आहे.
11ज्ञान्यांची वचने पराण्यांसारखी असतात; सभापतीचे बोल घट्ट ठोकलेल्या खिळ्यांप्रमाणे असतात; एकाच मेंढपाळांपासून ती प्राप्त झाली आहेत.
12ह्याखेरीज, माझ्या पुत्रा, असा बोध घे की ग्रंथरचनेला काही अंत नाही; बहुत ग्रंथपठण देहास शिणवते.
13आता सर्वकाही तुम्ही ऐकले; सर्वांचे सार हे की देवाचे भय धर व त्याच्या आज्ञा पाळ; मनुष्यकर्तव्य काय ते एवढेच आहे.
14सगळ्या बर्‍यावाईट गुप्त गोष्टींचा न्याय करताना देव सगळ्या कृत्यांची झाडाझडती घेईल.

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in

YouVersion uses cookies to personalize your experience. By using our website, you accept our use of cookies as described in our Privacy Policy