YouVersion Logo
Search Icon

आमोस 7

7
विनाशाचे तीन दृष्टान्त : टोळ, अग्नी व ओळंबा
1प्रभू परमेश्वराने मला दाखवले : तेव्हा पाहा, पडसाळ उगवण्याच्या सुमारास त्याने टोळ उत्पन्न केले; आणि पाहा, राजाकरता कापणी झाल्यावर उगवलेले ते गवत होते.
2आणि असे झाले की त्यांनी देशातील झाडपाला खाऊन फस्त केला तेव्हा मी म्हणालो, “हे प्रभू परमेश्वरा, मी विनंती करतो, क्षमा कर, याकोबाचा कसा टिकाव लागेल? कारण तो दुर्बळ आहे.”
3तेव्हा परमेश्वराला ह्याबद्दल अनुताप झाला व तो म्हणाला, “असे घडायचे नाही.”
4प्रभू परमेश्वराने मला दाखवले तेव्हा पाहा, शासन करण्यास त्याने अग्नीला बोलावले, तेव्हा त्याने महासागर खाऊन टाकला व भूमीही तो खाऊन टाकणार होता.
5तेव्हा मी म्हणालो, “हे प्रभू परमेश्वरा, मी विनंती करतो की हे थांबव; याकोबाचा कसा टिकाव लागेल, कारण तो दुर्बळ आहे!”
6तेव्हा परमेश्वराला ह्याबद्दल अनुताप झाला; प्रभू परमेश्वर म्हणाला, “हेही घडायचे नाही.”
7त्याने मला दाखवले तेव्हा पाहा, ओळंबा लावून बांधलेल्या भिंतीवर प्रभू उभा आहे, त्याच्या हातात ओळंबा आहे.
8परमेश्वर मला म्हणाला, “आमोसा, तुला काय दिसते?” मी म्हणालो, “ओळंबा.” प्रभू म्हणाला, “पाहा, माझे लोक इस्राएल ह्यांच्यामध्ये मी ओळंबा धरतो; मी ह्यापुढे त्यांची गय करणार नाही;
9इसहाकाची उच्च स्थाने ओसाड होतील, इस्राएलाच्या पवित्र स्थानांची नासधूस होईल, आणि मी तलवार घेऊन यराबामाच्या घराण्यावर उठेन.”
आमोस व अमस्या
10मग बेथेल येथील याजक अमस्या ह्याने इस्राएलाचा राजा यराबाम ह्याला निरोप पाठवला की, “इस्राएल घराण्याच्या भरवस्तीत आमोसाने फितुरी केली आहे, त्याची सर्व वचने देशाला सहन होत नाहीत.
11कारण आमोस म्हणतो, ‘यराबाम तलवारीने मरेल, व इस्राएलास त्याच्या देशातून खातरीने पकडून नेतील.”’
12मग अमस्या आमोसाला म्हणाला, “अरे द्रष्ट्या, जा, यहूदा देशात पळून जा; तेथे संदेश सांगून पोट भर;
13पण बेथेलात ह्यापुढे संदेश सांगू नकोस, कारण हे राजाचे पवित्रस्थान, ही राजधानी आहे.”
14तेव्हा आमोस अमस्याला म्हणाला, “मी संदेष्टा नाही किंवा संदेष्ट्याचा पुत्र नाही; तर मी गुराखी, उंबरांच्या झाडांची निगा राखणारा आहे.
15मी कळपांमागे असता परमेश्वराने मला निवडले; परमेश्वर मला म्हणाला, ‘जा, माझे लोक इस्राएल ह्यांना संदेश सांग.’
16तर परमेश्वराचे वचन ऐक; तू म्हणतोस ‘इस्राएलाविरुद्ध संदेश सांगू नकोस, इसहाकाच्या घराण्याविरुद्ध शब्द काढू नकोस.”’
17ह्यास्तव परमेश्वर म्हणतो की, “तुझी बायको नगरात वेश्या होईल, तुझे पुत्र व तुझ्या कन्या तलवारीने पडतील. तुझी जमीन सूत्र लावून वाटून टाकतील, तू स्वतः अमंगळ देशात मरशील, आणि इस्राएलास त्याच्या देशातून खातरीने बंदिवान करून नेतील.”

Currently Selected:

आमोस 7: MARVBSI

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in