YouVersion Logo
Search Icon

१ करिंथ 2

2
तत्त्वज्ञान व प्रकटीकरण
1बंधुजनहो, मी तर तुमच्याकडे आलो तो वक्तृत्वाच्या अथवा ज्ञानाच्या श्रेष्ठतेने देवाचे रहस्य तुम्हांला सां असे नाही.
2कारण येशू ख्रिस्त, म्हणजे वधस्तंभावर खिळलेला येशू ख्रिस्त, ह्याच्याशिवाय मी तुमच्याबरोबर असताना दुसरे काही जमेस धरू नये असा मी ठाम निश्‍चय केला.
3आणि मी तअशक्त, भयभीत व अतिकंपित असा झालो.
4,5तुमचा विश्वास मनुयांच्या बुद्धिमत्तेवर उभारलेला नसावा तर देवाच्या सामर्थ्यावर उभारलेला दिसावा म्हणून माझे भाषण व माझी घोषणा ज्ञानयुक्त अशा मन वळवणार्‍या शब्दांची नव्हती, तर आत्मा व सामर्थ्य ह्यांची निदर्शक होती.
6तथापि जे पोक्त आहेत त्यांना आम्ही ज्ञान सांगतो; पण ते ज्ञान ह्या युगाचे नाही, आणि ह्या युगाचे नाहीसे होणारे जे अधिकारी त्यांचेही नाही.
7तर देवाचे गूढ ज्ञान आम्ही सांगतो; तुप्त ठेवलेले होते, ते देवाने युगांच्या पूर्वी तुमच्याआमच्या गौरवाकरता नेमले होते.
8ते ह्या युगातल्या अधिकार्‍यांतील कोणालाहळले नव्हते; कारण त्यांना ते कळले असते तर त्यांनी गौरवाच्या प्रभूला वधस्तंभावर खिळले नसते;
9हे तर ह्या शास्त्रलेखाप्रमाणे आहे,
“डोळ्यानहले नाही,
कानाने जे ऐकले ने नाही
व माणसाच्या ‘मनात जे अले नाही,
ते आपणावर प्रीत करणार्‍यांसाठी
देवाने सिद्ध केल आहे;”
10कारण देवाने ते आत्म्याच्या द्वारे आपल्याला प्रकट केले; कारण आत्मा हा सर्व गोष्टींचा व देवाच्या गहन गोष्टीचाही शोध घेतो.
11मनुष्याच्या ठायी वसणारा जो आत्मा त्याच्यावाचून मनुष्यया गोष्टी ओळखणारा मनुष्यांमध्ये कोण आहे? तसा देवाच्या गोष्टी ओळखणारा देवाच्या आत्म्याशिवाय कोणी नाही.
12आपल्याला जगाचा आत्मा नव्हे, तर देवापासून निघणारा आत्मात्मा मिळाला आहे; ह्यासाठी की, जे देवाने आपल्याला कृपेने दिले ते आपण ओळखून घ्यावे.
13ते आम्ही मानवी ज्ञानाने शिकवलेल्या शब्दांनी नव्हे तर पवत्र आत्म्याने शिकवलेल्या शब्दांनी, आध्यात्मिक गोष्टींबरोबर आध्यात्मिक गोष्टींची संगती लावून सांगतो.
14स्वाभाविक वृत्तीचा माणूस देवाच्या आत्म्याच्या गोष्टी स्वही, कारण त्या त्याला मूर्खपणाच्या वाटतात; आणि त्याला त्या समजू शकणार नाहीत, कारण त्यांची पारख आत्म्याच्या द्वारे होते.
15जो आध्यात्मिक आहे तो तर सर्व गोष्टी पारखतो, तरी त्याची स्वतपारख कोणाकडूनही होत नाही.
16“प्रभूचे मन असे कोणी ओळखले आहे की त्याने त्याला शिकवावे?” अवावे?” आपल्याला तर ख्रिस्ताचे मन आहे.

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in

YouVersion uses cookies to personalize your experience. By using our website, you accept our use of cookies as described in our Privacy Policy