प्रिय भाऊ अनं बहिणीसवन, ज्या तुम्हीन परका अनं अनोळखी शेतस त्या तुमले मी ईनंती करस की, जिवसंगे लढाई करनारा शारिरीक वासनांपाईन दुर रहा; गैरयहूदी लोकसमा आपली वागणुक चांगली ठेवा, यानाकरता की, ज्यानाबद्दल त्या तुमले वाईट कामं करनारा समजीन तुमना विरूध्द वाईट बोलतस त्याबद्दल त्यासनी तुमना चांगला कामे दखीन बातमीना दिनले देवनं गौरव कराले पाहिजे.