ख्रिस्ताचे अनुसरण करणे预览

ख्रिस्ताचे अनुसरण करणे

12天中的第3天

अनुसरण करण्याचा अर्थ जाणणे नाही

येशूचे अनुसरण करणे रोमांचक आहे कारण अनेकदा आपल्याजवळ तपशील नसेल. प्रेरणा प्राप्त करण्यासाठी आणि आम्हाला कमी एकटेपणा वाटावा म्हणून आपल्या विश्वासाच्या नायकांकडे पहा. अब्राहम आणि सारा यांना त्यांच्या देशातून अज्ञात ठिकाणी पाचारण करण्यात आले होते,तसेच नोहाला त्याच्या कुटुंबास आणि प्राण्यांस आश्चर्य देण्यासाठी प्रचंड जहाज बांधण्याद्वारे जलप्रलयाची तयारी करण्यास सांगण्यात आले होते. नहेम्याला त्याच्या दूर मायदेशात तुटलेल्या भिंतींची पुनर्निर्मिती करण्यासाठी मार्गदर्शन प्राप्त झाल्याचे वाटले,त्याचवेळी संदेश त्यांनी अद्याप न पाहिलेल्या शत्रूंच्या हातून होणाऱ्या आसन्न आपत्तीची पत्रे लिहिली. त्यांच्यापैकी कोणाजवळही संपूर्ण चित्र नव्हते. त्यांच्याजवळ फुटकळ चित्रे होती जी पाहण्याची देवाने त्यांस परवानगी दिली त्याचवेळी बाकीच्या गोष्टींसाठी त्यांना परमेश्वरावर पूर्ण विश्वास ठेवावयाचा होता. पुढचे पाऊल अत्यंत धोकादायक दिसत असले तरीही देव त्यांस जेथे घेऊन गेला तेथे त्यांना पाऊल दर पाऊल ढेंगा टाकत चालावयाचे होते.

येशूचे अनुसरण करीत असताना आज आम्हाला तेच करावयाचे आहे. त्याच्या वचनाप्रत आणि वाणी आज्ञाधारक राहून जेव्हा मी आपले पाऊल पुढे टाकतो,तेव्हा मला असे आढळून येते की तो आपल्यासाठी अधिकाधिक प्रगट करीत आहे.

जर तुम्ही येशूचे अनुसरण केल्यानंतर तुमच्या जीवनासाठी स्पष्ट आणि पूर्ण आराखडा शोधत असाल,तर तुम्ही निराश होऊ शकता कारण असा कुठलाही दस्तावेज नाही. तुमच्याजवळ जे आहे ते म्हणजे त्याचे वचन,जे त्याच्या अंतःकरणापासून तुमच्यासाठी जवळजवळ एका प्रेमपत्रासमान आहे. जेव्हा तुम्ही त्याचे वचन वाचावयास सुरूवात करता आणि ते तुमच्या अंतःकरणाशी लावून घेता तेव्हा तुम्हाला दिसून येईल की विश्वासाच्या प्रवासात चालत असतांना ते तुमचा मार्ग प्रकाशित करील. त्याचे वचन तुम्हाला पतनापासून वाचविल आणि त्याचवेळी तुम्हाला त्या मार्गाने नेईल जो देवाने तुमच्यासाठी ठरविलेला आहे. तुम्ही या मार्गावरून भटके शकता का?होय,तुम्ही भटकू शकता,पण तुम्ही हे आश्वासन प्राप्त करू शकता की आमचा एक उत्तम मेंढपाळ आहे जो आपल्या भटकणार्या मेंढरांच्या मागे जातो. तुम्ही आपल्या मेंढपाळापासून फार दूर गेलेले नाही की तो तुम्हाला शोधू शकणार नाही व पुन्हा त्या दिशेस आणू शकणार नाही.

घोषणा: मला कदाचित माझ्या भविष्याची माहिती नसेल पण माझ्या देवाला माहीत आहे!

读经计划介绍

ख्रिस्ताचे अनुसरण करणे

जर तुम्ही हा विचार करीत असाल की खरोखर दररोज येशूचे अनुसरण कसे करावे तर ही बायबल योजना परिपूर्ण आहे. येशूला होय म्हणणे अर्थातच पहिले पाऊल आहे. पण जे होते, ते म्हणजे वारंवार हो म्हणण्याचा आणि त्याच्याबरोबर पाऊल टाकण्याचा आयुष्यभराचा प्रवास आहे.

More

相关题材的计划