ख्रिस्ताचे अनुसरण करणे预览

ख्रिस्ताचे अनुसरण करणे

12天中的第1天

पाचारण

येशूला जाणणे ही एक गोष्ट आहे. त्याला प्रभू व तारणारा म्हणून आपल्या जीवनात आमंत्रित करणे ही दुसरी गोष्ट आहे. त्याचे अनुसरण करणे ही पूर्णपणे वेगळी गोष्ट आहे. त्यासाठी एका निश्चित वचनबद्धतेची आणि शिस्तीची गरज आहे. आपल्या मनात हे कल्पनाचित्र रंगवा की तुम्ही पूर्वी ज्या ठिकाणी कधीही गेला नव्हता त्या ठिकाणचा मार्ग शोधत असताना तुम्ही गुगल मॅपचे अनुसरण करता. तुमच्या गंतव्य स्थानी पोहोचण्यासाठी तुमचे मार्गदर्शन करणाऱ्या आवाजाचे तुम्हाला काटेकोरपणे अनुसरण करावे लागेल. कधी कधी चुकीमुळे अॅप तुम्हाला चुकीच्या जागी घेऊन जाईल,पण येशू तुम्हाला कधीही चुकीच्या मार्गावर नेणार नाही. तुम्हाला असे वाटेल की तो तुम्हाला रुळावलेल्या रस्त्यावरून दूर नेत आहे,पण तो तुम्हाला कोठेही का नेत असेना,तो तुमच्या सोबत राहतो.

आज आपण सोशल मीडियाच्या युगात जगत आहोत जेथे आम्हास ही जाणीव आहे की आम्ही कोणाचे अनुसरण करतो आणि कोण आमचे अनुसरण करतो. ज्याला आम्ही फॉलो किंवा अनुसरण करतो त्याने पाठवलेल्या विषय वस्तूची ही जर आम्ही सहमत नसू तर त्यांना अनफोलो करण्याचा पर्याय आमच्याजवळ असतो. तरीही,येशूबरोबर गुंफलेले जीवन अतिशय वेगळे आहे! याचा अर्थ आहे आपल्या जीवनास त्याच्या आवाजाशी जुळवून घेणे आणि प्रत्येक गोष्टीसाठी त्याच्यावर पूर्णपणे अवलंबून राहणे! जर तुम्ही त्याला अनफॉलो करायचे किंवा त्याला ब्लॉक करायचे ठरवले तर,त्याने तुमच्यासाठी जे काही योजिले आहे ते तुम्हाला गमवावे लागेल. तरीही तो तुमची वाट पाहणे सोडत नाही.

जरी वाट रखरखित असली आणि तुम्हाला असे वाटते की देव तुमच्या अंतःकरणाच्या कठोर भागावर कार्य करीत आहे,तेव्हा तुम्ही त्याचे अनुसरण करण्याची निवड करावयास हवी.. तुम्हाला त्याच्या आरोग्यदायक स्पर्शाचा किंवा त्याच्या खात्रीलायक वाणीचा विरोध करावासा वाटत असला तरीही तो आम्हास स्वतःकडे ओढून घेणे थांबवत नाही. त्याचे अनुसरण करण्यासाठी आवश्यक आहे की आपण त्याच्या शक्य तितक्या जवळ राहावे यासाठी की आपल्याला त्याच्या हातावर आपली पकड ठेवता यावी आणि आपली इंद्रिये त्याच्या सौम्य मार्गदर्शनाप्रत जागृत राहावी.

घोषणा: सर्व विषम परिस्थितीतही येशूचे अनुसरण करेन

读经计划介绍

ख्रिस्ताचे अनुसरण करणे

जर तुम्ही हा विचार करीत असाल की खरोखर दररोज येशूचे अनुसरण कसे करावे तर ही बायबल योजना परिपूर्ण आहे. येशूला होय म्हणणे अर्थातच पहिले पाऊल आहे. पण जे होते, ते म्हणजे वारंवार हो म्हणण्याचा आणि त्याच्याबरोबर पाऊल टाकण्याचा आयुष्यभराचा प्रवास आहे.

More

相关题材的计划